पुणे : महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या घरेलु कामगार महिला कार्यकर्त्यांनी,कामगार उपायुक्त कार्यालय व विश्राम बाग तसेच फरास खाना पोलीस स्टेशन मधील अधिकारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या घरेलु कामगार महिला कार्यकर्त्यांनी कामगार उपआयुक्त पुणे श्री.अभय गिते, सहाय्यक कामगार आयुक्त श्री.मुजावर तसेच विश्राम बाग/फरासखाना पोलिस स्टेशन मधील कर्तव्य दक्ष पोलीस बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात पोलीस बांधवांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता सर्व समाजाची काळजी घेतली त्या कर्तव्य दक्ष पोलीस बांधवांना याही वर्षी घरेलु कामगार महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधुन रक्षा बंधन कार्यक्रम करण्यात आला.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष मिना पंडित, प्रदेश चिटणीस सुवर्णा कोंढाळकर, स्मिता कोरडे, पुणे जिल्हा अध्यक्ष उषा जाधव, सुनीता बढे, मिनाझं शेख, वर्षा ताडे, मीनाक्षी बागुल, राजेश्वरी महाडेश्वर, उषा मोहिते, सुजाता गुंजाळ, प्रदेश सरचिटणीस शरद पंडित उपस्थित होते.

