पुणे : पुणे येथील सुतिका सेवा मंदिर (गोडबोले हाॅस्पीटल) व भारतीय मजदूर संघ यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला. या वेतनवाढ कराराचा लाभ सुतिका सेवा मंदिर( गोडबोले हाॅस्पीटल) येथे कार्यरत असलेल्या नर्सेस व चर्तुथ श्रेणी मध्ये काम करणारे कामगारांना मिळणार आहे.
वेतनवाढ करारातील ठळक मुद्दे :
- सदर करार दि 1 जानेवारी 2021 पासून 3 वर्षं करिता असेल.
- सध्याच्या वेतनात रू 6000 प्रति माहे वाढ करण्यात आली. त्यातील 40% रक्कम मुळ वेतनात व 60 % रक्कम इतर भत्ता मध्ये दिली जाणार आहे. करार मुळे कामगारांचे वेतन कमीतकमी रूपये 22 हजार व जास्तीत जास्त रुपये 28 हजार
- हाॅस्पीटल उद्योगाला लागु असलेला बदलता महागाई भत्ता मिळाणार आहे .
- प्रत्येक कामगारांची रू 3 लाखा ची मेडिकल पाॅलिसी हाॅस्पीटल च्या वतीने काढण्यात येणार आहे त्याचा प्रिमीयम व्यवस्थापन भरणार आहे.
- हाॅस्पीटल मध्ये उपलब्ध असलेल्या मेडिकल सुविधा कामगारांना मोफत दिल्या जाणार असुन कामगारांची सुन व मुलगी यांची प्रथम प्रसूती हाॅस्पीटल च्या वतीने मोफत केली जाणार आहे.
- दिवाळी बक्षिस म्हणून एक महिना च्या पगार ऐवढी रक्कम दिवाळी बक्षिस म्हणून मिळणार आहे. तसेच दर वर्षी तीन गणवेश मिळणार आहे.
यावेळी कोविड महामारी मध्ये कामगांरांनी जीव धोक्यात घालून पेशंट ची सेवा केली आहे त्या बद्दल भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा वतीने करोनो योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
सदर करारावर सुतिका सेवा मंदिर (गोडबोले हाॅस्पीटल) या व्यवस्थापनाच्या वतीने मुख्य कार्यकारी विश्वस्त डाॅ.दिलीप देवधर, डाॅ.अलोक देवधर, विश्वस्त डाॅ.राम धोंगडे, श्री प्रदीप आठवले यांनी व भारतीय मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ, कामगार प्रतिनिधी सौ सुजाता वाळुंज, गणेश जाबरे यांनी संघटनेच्या वतीने वेतन वाढ करारावर सह्या केल्या. या वेळी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे उपस्थित होते.
