औरंगाबाद : वाळुज एमआयडीसी जवळील करोडी या परिसरातील मित्तल पॉलीग्रेन (Mittal Polygrains LLP) या कंपनी मधील काम करणाऱ्या महिला यांनी संघर्ष श्रमजीवी जनरल कामगार संघटनेचे सभासद स्वीकारले. आज (दि.४ ऑगस्ट) येथील काम करणाऱ्या महिलांच्या हस्ते संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले
आपल्या न्यायोचित मागण्यासाठी संघटनेच्या बॅनरखाली एकत्र येऊन आपला हक्क मिळवण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी केलेला आहे आणि या महिलांना त्यांना त्यांचा न्याय्य व उचित हक्क मिळवून देण्यासाठी संघटना यापुढे कंपनी प्रशासनाशी चर्चा करून महिलांना न्याय मिळवून देणार आहे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी संघटना अध्यक्ष पांडुरंग जी गायकवाड, सचिव सुधीर खैरे, कार्याध्यक्ष सचिन भिंगारे, मराठवाडा सरचिटणीस लोखंडे, मराठवाडा उपाध्यक्ष मस्के, युनिट अध्यक्ष छाया गायकवाड, शारदा सोनवणे, वत्सलाबाई बनकर, मुक्ताबाई देवकर आणि इतर महिला उपस्थित होत्या.
