महिंद्रा कंपनी नागपूर येथे कंत्राटदार कामगारांचा वेतनवाढ करार संपन्न

नागपूर : महिंद्रा व्यवस्थापन व सत्य विजय कामगार संघटना आणि निर्वाचित कामगार प्रतिनिधी यांच्या वतीने येथील महिंद्रा लाँजिस्टिक मध्ये काम करणारे ईन्डस कामगारांसाठी पगार वाढीचा आणि अन्य सुविधांचा करार हा अतिशय मैत्रीपूर्ण व आनंदी वातावरणात अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त श्री. राजदिप धुर्वे यांच्या समक्ष दिं. ०६/०८/२०२१ शुक्रवार रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :

  • कराराचा कालावधी १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२५ असेल

  • एकुण पगार वाढ रु.२६००/-

  • हा करार ईन्डस कामगारांना एकसमान झाला.

  • पगार वाढतील काही रक्कम नियमानुसार बेसिक आणि डी.ए मध्ये वाढविण्यात येईल

  • या करारा मध्ये सणाच्या सुट्या ह्या ८ वरुन १२ करण्यात आल्या. 

  • या करारा मध्ये वर्षे २०१६ च्या करारा मधुन प्रकरण क्र. ७ मधील ई नं. चा पॅरा कमी करण्यात आला व वर्षे २०१६ च्या प्रकरण क्र. ७ मधील ड या पॅराला सत्य विजय कामगार संघटना ने आव्हान केले आहे. 

  •  करारामध्ये सोई व सुविधा पुर्वीप्रमाणेच राहील.

      सदर करार संपन्न होण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने नागपूर कार्मिक संबंध व विकास या विभागाचे जनरल मॅनेजर श्री.अभिजीत कळंबे, श्री.सुहास पाटील (सिनियर मॅनेजर), श्री.अमित काळे (महिंद्रा लाँजिस्टिक एच.आर), श्री.प्रशांत नंदनवार (कंत्राटदार) तसेच सत्य विजय कामगार संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री.संजयजी महाले, निर्वाचित कामगार प्रतिनिधी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमी. नागपूर ट्रॅक्टर प्लान्ट मधील प्रतिनिधी विनोद अवचट, बाबा मानकर, प्रमोद पाल, ईन्डस मॅन पावर सर्विसेस मधील कामगार नितेश पिंपळशेंडे, चंद्रशेखर मुन, विलास ढोके, प्रशांत सोनी, पंकज गांवडे, निलेश गहनेवार, भिसे, मिटकर, भगतकर, चतुर्वेदी, इंगळे, उत्तम चौथा आदींच्या उपस्थितीत करार संपन्न झाला. महिन्द्रा कंपनीतील कार्यरत सर्व कंत्राटी कामगारांपैकी फक्त ईन्डस मॅनपॉवर ह्यांचाच करार सत्यविजय कामगार संघटना यांनी घडवून आणला त्याबद्दल कामगारांनी आभार व्यक्त केले.