बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी मदत करा - आयटक कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन

नऊ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त देशव्यापी आंदोलना अंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन !

सांगली : सध्या महापुरामुळे जनतेचे प्रचंड नुकसान झाले असून त्यामध्ये नोंदीत बांधकाम कामगार आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात घरे उद्ध्वस्त झालेली आहेत व बुडाली आहेत. बांधकाम कामगारांच्या घर बांधणी साठी बांधकाम कल्याणकारी मंडळांमध्ये दोन लाख रुपये देण्याची तरतूद आहे. तर या तरतुदीनुसार प्राधान्याने पूरग्रस्त बांधकाम कामगारांना घरे बांधून देण्यात यावेत. अशी मागणी करत 9 ऑगस्ट 2021 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

     तसेच covid-19 लॉक डाऊन मध्ये आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिले होते. या वर्षी मात्र फक्त पंधराशे रुपये दिले आहेत. उर्वरित साडेतीन हजार रुपये रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत असा ठराव दोन वर्षांपूर्वी केलेला आहे की, नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये देण्यात येतील परंतु या ठरावाला अजूनही शासनाने मंजुरी दिली नाही. विशेषता सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अकरा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. तरीही निर्णय होत नसल्यामुळे शासनाचा निषेध करण्यात आला.

        या आंदोलनाचे नेतृत्व कॉ शंकर पुजारी, कॉ विजय बचाटे, शीतल मगदूम, सुरेश सुतार, वर्षा गडचे राम कदम, प्रकाश कुंभार, सोमलिंग आईवळे, उत्तम पाटील, देविदास राठोड, हुसेन गवंडी व तुकाराम मोहिते इत्यादींनी केले.