कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांसाठी सरकार २०२२ पर्यंत भरणार पीएफ

कोरोना महामारीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कोरोनामुळे अनेक जणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो आहे. मात्र त्यांच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे कोरोना काळात नोकरी गमावलेल्या त्यांच्या पीएफ खात्यात २०२२ पर्यंत पीएफचा हिस्सा जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली आहे.

ज्या  कर्मचाऱ्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी आहे, अशाच कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबतची औपचारिक घोषणा केली आहे. दुसरीकडे 16 योजनांतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ही  घोषणा अशा लोकांसाठी आहे ज्यांनी पँडेमिक काळात नोकरी गमावली आहे. त्यांच्या पीएफ खात्यात 2022 पर्यंत पीएफचे योगदान सरकार जमा करणार आहे. दरम्यान अर्थ मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांची ईपीएफओमध्ये नोंदणी असेल, त्यांनाच केवळ या योजनेचा लाभ मिळेल. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी असे म्हटले आहे की, केंद्र सरकार 2022 पर्यंत नियोक्ता तसेच कर्मचाऱ्यांच्या पीएफचा हिस्सा देईल ज्यांनी नोकरी गमावली आहे, परंतु औपचारिक क्षेत्रातील छोट्या नोकऱ्यांमध्ये काम करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे, ज्यांची यूनिट्स ईपीएफओमध्ये रजिस्टर्ड असतील.

अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे 25 हजारांहून अधिक कामगार आपल्या गावी परतले आहेत. त्यांना केंद्र सरकारच्या 16 योजनांतर्गत रोजगार दिला जाईल. यासाठी सरकारने मनरेगाचे बजेट 60 हजार कोटीवरून 1 लाख कोटी केलं आहे., असंही त्यांनी पुढे सांगितलं.