कंपनी चालू करा, कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार द्यावा म्हणून 300 फूट टॉवर वरती चढून आंदोलन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल कर्मचाऱ्यांना वेतन पूर्ण द्यावे, फिनले मिल लवकरात लवकर सुरू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी गिरणी कामगार संघाचे पदाधिकारी बॉयलरचा टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात असणारे एनटीसी भारत सरकारमार्फत चालवण्यात येणारी फिनले मिल सध्या 18 महिन्यांपासून बंद असल्यामुळे कामगारांची दयनीय अवस्था झालेली आहे. यासाठी बरेचदा शासनाला निवेदन सुद्धा देण्यात आली तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनसुद्धा करण्यात आली होती. तरीसुद्धा मिल सुरू झालेली नाही व आता येथील कामगारांना कामावार रुजू सुद्धा करून घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मिल बंद असल्यामुळे कामगारांची परिस्थिती दयनीय आहे, त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मिलमधील 90 टक्के कामगारांनी आपला भविष्य निर्वाह निधी काढलेला आहे. सध्या मिल बंद असल्यामुळे कामगार नैराश्याच्या गर्तेत गेला आहे. 

स्थानिक फिनले मिल अनेक महिन्यांपासून बंद असून, बरेचदा शासनाला निवेदन सुद्धा देण्यात आली. आंदोलनसुद्धा करण्यात आलीत. तरीसुद्धा मिल सुरू झाली नाही. येथील कामगारांना रुजू सुद्धा करून घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मिल बंद असल्यामुळे कामगारांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही या टॉवरवरच बसू, इथेच उपोषण करू असा इशारा टॉवरवर चढलेल्या आंदोलनकांनी दिला आहे. अभय माथने, धर्मा राऊत व दिनेश उघडे अशी टॉवरवर चढलेल्या तिघांची नावे आहेत. सुरू असलेले आंदोलनाने परिसरात पोलिसांचा फौजफाटाही दाखल झालेला आहेत.