सातारा : शिरवळ येथील रियटर इंडिया प्रा. लिमिटेड (Rieter India Pvt Ltd) या कंपनीतील बहुसंख्य कामगारांनी रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन (Rieter India Employees Federation) नावाची नोंदणीकृत संघटना स्थापन केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेची पहिली सर्वसाधारण सभा झूम मिटिंग द्वारा दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात आली. सभेस कंपनीतील बहुसंख्य कामगारांनी सहभाग घेतला होता.सभेचे अध्यक्ष किरण गोळे होते.
दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी संघटनेस नोंदणी प्रमाणपत्र मिळाले असून दिनांक ६ ऑगस्ट 2021 रोजी वेतनवाढ व इतर मागणी संदर्भातील मागणी पत्र कंपनी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांचेकडे सादर केले असून त्याबाबतची पहिली बैठक सहाय्यक कामगार आयुक्त,सातारा यांचे कार्यालयात झाल्याची माहिती सभेत अध्यक्ष किरण गोळे व जनरल सेक्रेटरी योगेश खामकर यांनी दिली तसेच रियटर इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन ही युनियन श्रमिक एकता महासंघास संलग्न असल्याची माहिती सभासदांना देण्यात आली.त्याचे सभासदांनी स्वागत करून मान्यता दिली.
सभेत श्रमिक एकता महासंघाचे पदाधिकारी,अध्यक्ष दिलीप पवार ,खजिनदार रोहित पवार तसेच सल्लागार मारुती जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.त्यामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थिती नुसार रणनीती आखणे,कामगारांच्या मागण्या सनदशीर मार्गाने सोडविणे,अवास्तव अपेक्षा न करणे,सर्व सभासदांनी कंपनीत शिस्तीच्या नियमांचे पालन करणे,संघटनेवरील विश्वास व संयम ठेवणे या बाबत मार्गदर्शन केले.तसेच श्रमिक एकता महासंघ, व इंडस्ट्री ऑल - ग्लोबल युनियन च्या कामकाजाविषयी माहिती सभेत देण्यात आली.
फेडरेशन चे अध्यक्ष किरण गोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.

