बारामती : बारामती, निंबुत येथील ज्युबिलंट इनग्रेव्हिया या नामांकित कंपनीमध्ये असलेल्या स्टाफ कर्मचाऱ्यांना देखील ज्युबिलंट कामगार संघटनेचे सभासद करण्याचा ऐतिहासिक निर्णय राष्ट्रीय कामगार आघाडी अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी घेतला.
सर्व स्टाफ कर्मचाऱ्यांना देखील कामगारां प्रमाणे रजा,बोनस, पगारवाढ इत्यादी सर्व सेवा करारानुसार सवलती मिळाव्या, तसेच त्यांच्या नोकरीची सुरक्षितता रहावी "समान काम समान दाम" ह्या कामगार कायद्यातील तरतुदीचा फायदा स्टाफ कर्मचाऱ्यांना देखील व्हावा म्हणून स्टाफ कर्मचाऱ्यांना संघटनेत प्रवेश देण्यासाठी ठराव मंजूर केला व संघटनेच्या घटनेत सुधारणा केली .
यामुळे स्टाफ कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता मिळणार असून आर्थिक व सामाजिक राहणीमान बदलणार आहे. यानिमित्त सर्व स्टाफ कर्मचाऱ्यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले व युनियन कार्यकारिणी यांचे आभार मानले.