मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल प्रदेश सरचिटणीसपदी सोमनाथ (आप्पा) शिंदे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
सोमनाथ (आप्पा) शिंदे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या प्रदेश सचिव म्हणून काम पाहिले आहे तसेच राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन चे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. यावेळी कामगार सेलचे शहराध्यक्ष राजेंद्र कोंडे उपस्थित होते.