कंपनी मध्ये झालेल्या अपघातांची माहिती कंपनीला ऑनलाईन भरावी लागणार

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचे दि.२६ ऑगस्ट २०२१ रोजी परिपत्रक प्रसिद्ध

मुंबई : कारखान्यात होणाऱ्या अपघातांची माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी दि.२६ ऑगस्ट २०२१ रोजी परिपत्रक प्रसिद्ध केले असून यामुळे सर्व कारखाने / कंपनी यांना झालेल्या अपघातांची माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे.

        कारखान्यात होणारे अपघात यांची माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयास वेळेवर प्राप्त होण्याकरिता संचालनालयाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून याद्वारे सर्व कारखानदारांना सुचित करण्यात कि त्यांच्या कारखान्यात आग, वायुगळती, स्फोट किंवा इतर कोणताही अपघात झाल्यास त्याची सविस्तर माहिती संचालनालयाच्या www.mahadish.in या संकेतस्थळावरील online services या मुख्य शीर्षकाखाली Accident  Reporting System मधील नमुना क्रमांक 24 किंवा 24-ए मध्ये विहित मुदतीत सादर करावी. 

      तसेच सदर नमुना क्रमांक 24 किंवा 24-ए ची प्रिंट कारखान्याच्या भोगवटदार / व्यवस्थापकाच्या स्वाक्षरीसह संचालनालयाच्या संबंधित कार्यालयात विहित वेळेत जमा करावी असे परिपत्रकात सांगितले आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचे दि.२६ ऑगस्ट २०२१ रोजी परिपत्रक खालील प्रमाणे :