रिजिकट टूल्स प्रा.लि (Rigicut Tools Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : भोसरी एमआयडीसी येथील रिजिकट टूल्स प्रा.लि.(Rigicut Tools Private Limited) या कंपनी मध्ये व्यवस्थापन व टी यु सी सी संलग्न एमआयडीसी वर्कर्स युनियन यांचे दरम्यान दि.26 ऑगस्ट 2021 रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला. 

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

  • कराराचा कालावधी 1 एप्रिल 2020 ते  31 मार्च 2023 असा तीन वर्षाचा आहे.

  • कामगारांना दरमहा कमीत कमी रु. 7750/- व जास्तीत जास्त रु. 8250/- पगार वाढ झाली. या करारामुळे कामगारांचे किमान वेतन दरमहा रु. 29307/-  तर कमाल वेतन दरमहा रु. 36149/- झाले आहे.

  • कामगारांना नऊ महिन्यांच्या फरकाची रक्कम मिळणार आहे.

      कारारावरती व्यवस्थापनाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक श्री.जयदीप सिंगल तर युनियनच्या वतीने अध्यक्ष श्री.माणिकराव सस्ते, जनरल सेक्रेटरी श्री.संभाजी शिंदे, खजिनदार श्री.नामदेवराव भोपते, युनिट प्रतिनिधी श्री.लक्ष्मणराव इंगवले, श्री.अशोक कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केल्या.