मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. नवलकर कम्युनिस्ट चळवळीच्या अत्यंत कर्मठ, लढाऊ नेत्या अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळानं मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्ष त्यांनी चळवळ चालवली होती. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या म्हणूनही त्या परिचित होत्या.
मुंबईतील बांधकाम कामगार, असंघटित कामगार, एअर इंडियाच्या कंत्राटी कामगारांना कायम नोकरी मिळविण्यासाठी सुप्रिम कोर्टात दाद मागून लढा यशस्वी करणाऱ्या लढाऊ नेत्या होत्या. के. के. सिंघवी यांच्या सहकाऱ्याने एअर इंडियाच्या हजारो कंत्राटी कामगारांना कायम नोकरीची हमी मिळवून दिली. तसेच जासूद या मासिकाच्या ही संपादिका होत्या. त्यांनी मार्क्सवादाशी व कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित अनेक पुस्तके अनुवाद केली होती.
महाराष्ट्रात झालेल्या डाव्या चळवळींमध्ये नवलकर यांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच त्यांनी हजारो कामगारांचे संघटन आपल्या लढाऊ वृत्तीच्या जोरावर केले होते. नवलकर यांच्या जाण्याने कम्युनिस्ट चळवळीची मोठी कधीही न भरुण येणारी हानी झाली आहे.
