पुणे : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व त्यावरील कठोर निर्बंध तसेच शासनाच्या ब्रेक दि चेन या मार्गदर्शक तत्वानुसार मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाला तर त्याला मेडिकल रजा देऊन संपुर्ण वेतन देण्यात यावे तसेच संसर्ग झाला म्हणून कामावरून कमी करू नये व आरोग्य तपासणी चे नियोजन असे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सुरक्षा रक्षक (Security guards) यांच्या साठी ब्रेक दि चेन मार्गदर्शक तत्वांचा अवलंब व्हावा. या बाबत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाने पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.
तथापि मागील लॉकडाऊन काळात केंद्र व राज्यशासन यांच्या आदेशाचे पालन न करता काही आस्थापनने सुरक्षा रक्षकांना कमी केले व त्यांना त्या कालावधीतील वेतन सुध्दा दिले नाही तसेच त्यावर मंडळाने कुठलीच कारवाई केली नाही. तसेच अटल बिमा व्यक्ती कल्याण योजना चा लाभ पण मंडळाकडून मिळाला नाही अशी तक्रार यावेळी करण्यात आली.
अशी माहिती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शंभु खंडाळे, प्रदेश पुणे विभाग प्रमुख किरण पवार, प्रदेश सचिव गणेश लांडगे, जिल्हाध्यक्ष अविनाश मुंढे, अनिल पारधी, हनुमंत मोरे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजकुमार काळे, पुणे ग्रामीण सचिव ज्ञानेश्र्वर हिवराळे यांनी दिली.
