सांगली : राज्य शासनाच्या कामगार विभागाने घोषित केलेल्या गृहपयोगी वस्तू देण्याच्या नावाखाली कामगारांकडून पैसे उकळले जात आहेत, ही कामगारांची लूट थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अमित कदम यांनी केली सहाय्यक कामगार आयुक्त यांना केली.
याबाबत निवेदनात म्हटले आहे राज्य शासनाने दिनांक १८ जानेवारी २०२१ ला कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू वितरण योजनेला शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली. त्यामुळे शासकीय योजनेच्या नावाखाली कामगारांची लूट करण्यासाठी काही संघटनांचे पदाधिकारी, एजंट, राजकीय पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. शासनाने मान्यता दिलेल्या ३० वस्तू सोडून दूरदर्शन संच, बेड, कपाट, तिजोरी मिळणार असल्याचे कामगारांना सांगितले जात आहे. या वस्तूंचा लाभ मिळवून देतो असे सांगून कामगारांकडून प्रत्येकी २०००/- रुपये घेतले जातात.
यामध्ये कामगारांची लूट थांबविण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या वस्तूंची यादी, वितरण प्रणाली जाहीर करावी तसेच त्याला प्रसिद्धी द्यावी त्यामुळे कामगार जागृती होईल तसेच कामगारांकडून पैसे उकळणाऱ्या एजंट वरती कारवाई करावी अशी मागणी कदम यांनी केली आहे. या निवेदनाची दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त गुरव यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
शासन निर्णय दि.१८ जानेवारी २०२१ नुसार बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्यात आली असून अद्याप योजना चालू होण्याअगोदरच कामगारांना आमिष दाखवणाऱ्या व त्यांच्याकडून पैसे गोळा करणाऱ्या लोकांवरती कारवाई करणे गरजेचे आहे.
