India Steel Works Limited, Khopoli workers' hunger strike postponed.
खोपोली : इंडिया स्टील वर्कस लिमिटेड, खोपोली येथील १३ कामगार विविध मागण्यासाठी कंपनी प्रवेश द्वारावर उपोषणाला बसणार होते तथापि कामगार कार्यालय येथे झालेल्या कंपनी व्यवस्थापन व कामगार चर्चे नुसार उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती करण्यात आले.
सविस्तर माहितीनुसार, इंडिया स्टील वर्कस लिमिटेड, खोपोली येथील १३ कामगार हे विविध मागण्यासाठी कंपनीच्या प्रवेश द्वारावर दि.१ मार्च २०२१ रोजी उपोषणाला बसणार आहे. त्याअनुषंगाने कामगार उपआयुक्त प्रदीप पवार व सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी व्होनाळकर यांनी कामगार कार्यालयात काल (दि.२५ फेब्रुवारी) रोजी बैठकीचे आयोजन केले.
यावेळी कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्यामध्ये मागण्या व त्यानुसार महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली त्यानुसार उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. यावेळी हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम, कंपनीचे मालक वरूण गुप्ता, व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
