औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (पूर्वीचे कारखाने निरिक्षक) ही महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय यंत्रणा असून तिचा उद्देश कारखाने अधिनियम, १९४८, महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ व त्याअंतर्गत तयार केलेले नियम यांची अंमलबजावणी करणे व कारखान्यात काम करीत असलेल्या कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य व कल्याणाची खात्री करणे होय.
वाढत्या कारखानदारी सोबतच वेळोवेळी कारखाने अधिनियम, १९४८ व महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. या विभागास धोकादायक रसायनांचे उत्पादन साठवण व आयात नियम,१९८९, रासायनिक अपघात (आपत्कालीन नियोजन, सुसज्जता व प्रतिसाद) नियम,१९९६ व महाराष्ट्र कारखाने (अतिधोकादायक कारखान्यांचे नियंत्रण) नियम,२००३ च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीसुध्दा देण्यात आलेली आहे. या विभागाची मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञानाचा अभ्यासक अशी नविन भूमिका लक्षात घेता जुन १९९१ मध्ये कारखाने निरिक्षक हे नाव बदलून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय असे करण्यात आले व निरीक्षक हे पदनाम बदलून संचालक असे करण्यात आले आहे.
संचालनालय ध्येय
कारखान्यातील कामगारांची सुरक्षा कल्याण व आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. म्हणूनच कामाचे ठिकाणी होणारे संभाव्य अपघात व संभाव्य आरोग्याचे धोके विचारात घेऊन ते समाधानकारकरित्या कमी करणे यासाठी हे संचालनालय वचनबध्द आहे. यामुळे कारखान्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.
