विमाधारक कामगार व विमाधारक महिलांना ईएसआयसी (ESIC) देणार विविध सुविधा

ESIC takes Major Policy Initiatives for better services to Insured Workers/Insured Women

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने  केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या १८४ व्या बैठकीत  सेवा यंत्रणा सुधारण्यासाठी व विमाधारक कामगारांना लाभदायक वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

ठळक मुद्दे

  • मातृत्वाचा  लाभ घेणार्‍या विमाधारक महिलांना योगदान अटींमध्ये सूट

  • जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत आजारपण आणि मातृत्व लाभ मिळण्यासाठी योगदान अटी शिथिल .

  • ईएसआयसी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे ५० सुपर स्पेशालिटी बेड्ससह ३०० खाटांचे रुग्णालय बांधणार

  • ईएसआयसी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे अतिरिक्त ५० बेड असलेल्या एसएसटी विंगसह ३५० खाटांचे  रूग्णालय बांधणार

  • हैदराबाद, तेलंगणा येथे ईएसआयसी सुपर स्पेशालिटी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात निगेटिव्ह प्रेशर आयसीयूची स्थापना.

  • ईएसआय महामंडळाने  सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षासाठी सुधारित अंदाज व अंदाजपत्रक आणि २०२१-२२ या वर्षाच्या  कामगिरी अंदाजपत्रकास मान्यता दिली.

ईएसआयसीच्या २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षासाठी सुधारित अंदाज आणि अर्थसंकल्पीय तरतूदीला  आणि २०२१-२२ या वर्षासाठी कामगिरी अंदाजपत्रकाला मंजुरी -

ईएसआय महामंडळाने  बैठकीत २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षासाठी सुधारित अंदाज आणि अर्थसंकल्पीय तरतूद  आणि २०२१-२२ या वर्षाच्या कामगिरी अंदाजपत्रकाला मंजुरी  दिली आहे.

या व्यतिरिक्त, सेवा वितरणाच्या यंत्रणेत सुधारणा करण्याशी संबंधित इतर सुमारे २५ बाबीही  नोंदवण्यात आल्या आणि त्याना  मान्यता देण्यात आली.

कामगार व रोजगार मंत्रालयाचे  सचिव अपूर्व चंद्रा, अतिरिक्त सचिव अनुराधा प्रसाद, आणि ईएसआयसीचे महासंचालक, ईएसआय महामंडळाचे सदस्य, ईएसआयसीच्या वित्त आयुक्त संध्या शुक्ला, ईएसआयसीच्या सीव्हीओ गरिमा भगत,आणि  इतर या बैठकीला उपस्थित होते.