लोणावळा : हिंजवडी औद्योगिक वसाहतीमधील Adient इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील कामगारांना १६,२३१/- रुपयांची वेतन वाढ जाहीर केली आहे. शिवक्रांती कामगार संघटना आणि Adient इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापन दरम्यान संघटनेचे प्रमुख सल्लागार व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. कंपनीतील १६३ कामगारांना या वेतन वाढीचा फायदा मिळणार आहे.
हा करार १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२२ असणार आहे. वेतन वाढ कराराप्रमाणे प्रत्येक कामगाराला पहिल्या वर्षी ८४२४/-, दुसऱ्या वर्षी ३५४९/-, तिसऱ्या वर्षी ४२९८/- रुपयांचे वेतन वाढ मिळणार आहे. तर कराराच्या फरकानुसार प्रत्येक कामगाराला १ लाख ३८ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच प्रत्येक कामगाराला एक लाख रुपयांचा ऍडव्हान्स पगार मिळणार आहे. कामगार आणि त्यांची दोन मुले, पत्नी आणि आई वडील यांच्यासाठी दोन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी सुविधा मिळणार आहे.
कामगारांना वर्षातून एक सहल, स्नेहसंमेलन, ट्रेकिंग ट्रिप, वार्षिक स्पोर्ट ऍक्टिव्हिटी लाभ मिळणार आहे. नाईटशिफ्ट साठी ७५/- रुपये दिवसाला भत्ता मिळणार आहे. सध्याच्या काळात भरघोस पगार वाढ झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त करत स्वागत केले.
करारावर संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस ॲड.विजय पाळेकर, बिंद्रा गणात्रा, रमेश पाळेकर, गुलाबराव मराठे, रवींद्र साठे, राजेंद्र पवार, प्रतीक पाळेकर, प्रथमेश पाळेकर कामगार प्रतिनिधी मच्छिंद्र तोडकर, अमोल ढमढेरे, जयदीप धुमाळ, राजेंद्र पेठकर, वैभव माने, संतोष पाटील, संजीव म्हेत्रे, अश्विन खोपडे यांनी स्वाक्षरी केली. कंपनी च्या वतीने निलेश बेलसरे, एच आर मॅनेजर सतीश कुलकर्णी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.