जागतिक मंदी व कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना सिटू युनियनने २४ तासात सहा उद्योगात वेतन वाढीचे करार केले.
नाशिक जिल्ह्यातील सातपूर एमआयडीसीतील शिरीन ऑटो लिमिटेड ,निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील पूर्वा केमटेक लिमिटेड, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ललित पाईप लिमिटेड ,अंबड औद्योगिक वसाहतीतील तुषार इंडस्ट्रीज आणि तुषार प्रिसिकॉम व सुविध इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज या सहा कंपन्यात हे करार करण्यात आले.
यामध्ये पुर्वा केम कंपनी मध्ये ७,२००/- रुपये, शिरीन ऑटो लिमिटेडमध्ये ७,८००/- रुपये, ललित पाईप मध्ये रू.७,५०० ते ८,०००/- पगारवाढ व नवीन १५ कंत्राटी कामगारांना कायम करणार, तुषार इंडस्ट्री व तुषार प्रिसीकाम मध्ये रू.६,५००/-, सुविध इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज अंबड नाशिक येथे रु.४२००/- या यापद्धतीने पगार वाढ देण्यात येईल.
तसेच त्याचबरोबर या कंपन्यातील कामगारांना महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर होणारा महागाई भत्त्यातील वाढही मिळणार आहे.याच करारातत बोनसही निश्चीत करण्यात आला आहे.या व्यतिरिक्त सुट्ट्या व मेडिक्लेम पॉलिसीची ही व्यवस्था करण्यात आली आहे .
या करारांवर सिटू युनियन च्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ.डी एल कराड, देविदास आडोळे, विजय विशे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे या पदाधिकाऱ्यांनी व संबंधित उद्योगातील फॅक्टरी कमिटी तुषार इंडस्ट्रीज मधुकर शिवदे, गजानन पाटील,यशवंत राय, अरविंद कुमार निषाद व पुर्वा केमटेक पिंपळगाव ब. कमिटी मेंबर्स सोपान मोगल,मोहन वाघ, गणेश गांगुर्डे, सुविध इंजि. इंडस्ट्रीज कमिटी मेंबर्स बंडु भागवत, कुलदीप सिंह तसेच ललित पाईप्स लि.शहापूर कमिटी मेंबर्स मनोज पाटील, प्रदीप भोईर, बाळु भोईर, सागर साठे, प्रकाश पतंगराव सदस्य यांनी सह्या केल्या.
२४ तासांमध्ये सहा वेतन वाढीचे करार करण्याचा हा महाराष्ट्रातील विक्रमच समजावा लागेल.