इंदापूर : पुना एम्प्लाॅईज युनियन (आयटक) चे उपाध्यक्ष, ग्रिव्हज कॉटन अॅन्ड अलाईड कंपनी एम्प्लाॅईज युनियन चे जाॅईंट जनरल सेक्रेटरी व आयटक महाराष्ट्र चे सचिव कॉम्रेड विजयसिंह विठ्ठल कदम यांचे शुक्रवारी ४ डिसेंबर २०२० रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त त्यांना पुना एम्प्लाॅईज युनियन च्या वालमोंट इंडिया, इंदापूर युनिट तर्फे कंपनीच्या गेटवर श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कामगार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी युनियनचे पदाधिकारी प्रमोद देशमुख, दिगांबर शिंदे, तुषार पवार, रमेश माने, सुभाष भोसले, सचिन देवकाते, जयकुमार साळुंखे व सर्व कामगार उपस्थित होते.
कॉम्रेड विजयसिंह विठ्ठल कदम (व्हि.व्हि.कदम) यांचा अल्प परिचय :
मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं फलटण. वयाच्या २० व्या वर्षी पुण्यात आले. प्रिमीयम कंपनी, चिंचवड येथे कामगार म्हणुन काम केले. वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त झाले. शांत व संयमी होते. पण मुद्द्याशी ठाम असायचे. आयटक (लाल बावटा) या संघटनेच्या माध्यमातून कामगार चळवळीचे नेतृत्व केले. आंदोलनं व संघर्ष करुन कामगारांच्या हक्कांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम केले. दवाखान्यात दाखल होण्याच्या एक दिवस अगोदर संघटनेच्या मासिक सभेला उपस्थित होते.