रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी मधील सुप्रीम ट्रिव्हज कामगार युनियन कार्यकारी सदस्य शिवाजी आव्हाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे,परशुराम साळवी, रमेशजी राणे,निलेशजी राणे तसेच युनियन प्रतिनिधी संजय दौंडकर, संदिप चत्तर, अनिल तुपेरे, किशोर समशेर, अरविंद दौंडकर, प्रवीण वामन हे सर्व कामगार बंधू उपस्थित होते.
"सन्मानीय राज साहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली व सन्मानीय कामगार नेते सचिनजी गोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे ध्येय व धोरणे सर्व सामान्य मराठी माणसापर्यंत, संघटित व असंघटित घटकामधील सर्व कामगारा पर्यंत पोहचविणे व त्यांना न्याय मिळवून देणे हे प्रमुख कामे अगदी चोखपणे पार पाडणार "
- शिवाजी आव्हाड,
पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य,महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
कार्यकारी सदस्य, सुप्रीम ट्रिव्हज कामगार युनियन