०१ एप्रिल २०२६ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणार - हिंद मजदूर सभा

पुणे : सन २०२० मध्ये केंद्र सरकारने चार श्रमसंहिता मंजूर करून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१/०४/२०२६ पासून करण्यात येणार आहे. या श्रमसंहितांशी अंमलबजावणी झाल्यास तो दिवस कामगारांच्या हिताच्या दृष्टीने काळा दिवस ठरणार आहे. गेली सहा वर्ष आपण सर्वच पातळीवर या श्रम सहितांचा विरोध करीत आहोत. मात्र केंद्र सरकार कामगारांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही. म्हणूनच ०१/०४/२०२६ हा दिवस आपण सर्वानी काळा दिवस म्हणून साजरा करावा असे आवाहन हिंद मजदूर सभा यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

    पत्रकामध्ये पुढे म्हटले आहे कि, आपल्या संघटना ज्या उद्‌द्योगांमध्ये काम करीत आहेत त्या उ‌द्योगांमध्ये आपण आपल्या कामगारांना काळ्याफिती लावून काम करण्यास सांगावे जेथे शक्य आहे तेथे निदर्शने, मोर्चे धरणे आंदोलन करावी. आपण कामगारांच्या हितासाठी सातत्याने आंदोलन करत आलेला आहात. यावेळी आपल्या मूलभूत प्रश्नावर आपण आपल्या संघटनेच्या सर्व ताकतीनेशी हा काळा दिवस साजरा करून कामगार हित विरोधी कायद्यांचा निषेध करावा.