राज्यातील ग्रामपंचायत कामगार मूळ किमान वेतन दर अधिसूचना व विशेष भत्ता रक्कम

 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (ग्रामपंचायत) कामधंदा किमान वेतन दर अधिसूचना दि.१० ऑगस्ट २०२० रोजी व विशेष भत्ता रक्कम दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाली असून या उद्योगामध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायत कामगारांना मूळ किमान वेतन दर + महागाई भत्ता = एकूण किमान वेतन मिळणे कायद्यानुसार आवश्यक आहे.

महाराष्ट्रात ज्या आस्थापनेत ५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्यांना याउपर (किमान वेतनाच्या म्हणजेच मूळ वेतन +विशेष भत्ता) ५% किमान घर भाडे भत्ता देखील मिळतो.

राज्यातील ग्रामपंचायत कामगारांना दर महिन्याला किमान वेतन कायदा, १९४८ (The Minimum Wages Act, 1948) नुसार खालील प्रमाणे किमान वेतन मिळणे गरजेचे आहे -

  • परिमंडळ १ करिता : मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १४,१२५/- + १,२४०/- = १५,३६५/-
२) अर्ध कुशल कामगार : १३,४२०/- + १,२४०/- = १४,६६०/-
३) अकुशल कामगार : १३,०८५/- + १,२४०/- = १४,३२५/-
  • परिमंडळ २ करिता : मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम
१) कुशल कामगार : १३,७६०/-  + १,२४०/- = १५,०००/-
२) अर्ध कुशल कामगार : १३,०५५/- + १,२४०/-  = १४,२९५/-
३) अकुशल कामगार : १२,७१५/-  + १,२४०/- = १३,९५५/-

  • परिमंडळ ३ करिता : मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन रक्कम

१) कुशल कामगार : १२,६६५/- + १,२४०/- = १३,९०५/-
२) अर्ध कुशल कामगार : ११,९६०/- + १,२४०/- = १३,२००/-
३) अकुशल कामगार : ११,६२५/- + १,२४०/- = १२,८६५/-

टीप - वरील किमान वेतन हे दि. ३० जून २०२२ पर्यंत लागू राहील. विशेष भत्ता रक्कम दर सहा महिन्याला बदलली जाते त्यानुसार मूळ किमान वेतन दर + विशेष भत्ता रकम = किमान वेतन रक्कम गणली जाते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (ग्रामपंचायत) कामधंदा किमान वेतन दर अधिसूचना दि.१० ऑगस्ट २०२० पाहण्यासाठी - क्लिक करा

दि. १ फेब्रुवारी २०२२ नुसार प्रसिद्ध झालेले मूळ किमान वेतन + विशेष भत्ता रक्कम = एकूण किमान वेतन पत्रक - क्लिक करा