शिंडलर इंडिया प्रा.लिमिटेड (Schindler India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : औद्योगिक वसाहतीमधील शिंडलर इंडिया प्रा.लिमिटेड (Schindler India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि शिंडलर इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये दिनांक 30 मार्च 2026 रोजी चौथा वेतनवाढ करार संपन्न झाला आहे. 

कराराची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :

करार कालावधी : सदर करार तीन वर्षासाठी असुन कराराचा कालावधी दिनांक 01/04/2026 ते 31/03/2029 पर्यंत तीन वर्षासाठी असेल. 

1.पगारवाढ : तीन वर्षासाठी सर्व कामगारांचे वेतन रुपये 24101/- एवढी पगारवाढ झाली आहे
सदर वाढ ही पहिल्या वर्षी 60% Rs-14460/-
दुसऱ्या वर्षी 20% Rs-4820/-
तिसऱ्या वर्षी 20% Rs-4820/-
अशी असेल. 
यापैकी 1000 व्हेरिअबल पे मध्ये असून ते वर्षाच्या शेवटी एकदम भेटणार आहेत.

उत्पादन वाढ : सध्या असलेल्या उत्पादनामध्ये 17% वाढ इलेवेटर विभागामध्ये करण्याचे युनियन ने मान्य केले आहे त्यापैकी पहिल्या वर्षी 10% दुसऱ्या वर्षी 4% आणि तिसऱ्या वर्षी 3% अशी असेल. व एस्केलेटर विभागामध्ये मोस्ट कार्यप्रणाली प्रमाणे कामाचे मोजमाप करून उत्पादन करण्याचे युनियन ने मान्य केले आहे.

क्वालिटी : कंपनीमध्ये जे उत्पादन निर्मिती केली जाईल ती उच्च दर्जाच्या गुणवत्तेची असली पाहिजे ही कंपनीची मागणी युनियन ने मान्य केली आहे.

कँटीन : सध्या चालू असलेल्या दररोज दुध आणि अंडी या मेनू मध्ये वाढ करून नाष्ट्यामध्ये सिझनेबल फ्रुट देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

मेडिक्लेम पॉलिसी : सध्या चालू असलेली  चार लाख पॉलिसी चालू राहील. या व्यतिरिक्त आई वडिलांचा एक लाखाच्या विमा पॉलिसी साठी समावेश करण्यात आला आहे. यासाठी जो प्रीमियम येईल त्यातील 50% प्रीमियम कंपनीने देण्याचे मान्य केले आहे.

सर्विस : सर्व सभासांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करण्याचे मान्य करण्यात आले.

रजादान योजना : मागील वेतनकरांमध्ये गंभीर आजारपणासाठी 75 रजा कंपनीने देण्याचे मान्य केले होते, पण याव्यतिरिक्त आपत्कालीन परिस्थिती मध्ये जर रजा हव्या असतील तर त्यासाठी रजादान योजना चालू करण्याचे कंपनीने व युनियन ने मान्य केले आहे.

ब्लॉक क्लोजर: अनिवार्य परिस्थिती मध्ये जर कंपनीला ब्लॉक क्लोजर घ्यावा लागला तर जितका दिवस ब्लॉक क्लोजर असेल त्यापैकी युनियन चे सर्व सभासद आपल्या शिल्लक रजांमधून 1.5% रजा देऊन सहकार्य करतील.

स्कॉलरशिप: जी युनियन सभासदांची मुले दहावी मध्ये व बारावी मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवतील त्यांना प्रोत्साहन म्हणून दहावीसाठी दहा हजार रुपये व बारावीसाठी 12 हजार रुपये देण्याचे कंपनीने मान्य केले आहे.

सेवावर्धापन दीन : युनियन च्या प्रत्येक सभासदाला त्याच्या सेवावर्धापन दिनादिवशी 2500 रुपयांचे कूपन देण्यात येईल.

वाहतूक सुविधा : सर्व कामगारांना आपत्कालीन परिस्थिती मध्ये फर्स्ट,जनरल व सेकंड शिफ्ट मधून हाफ डे जाण्यासाठी वाहतूक सुविधा देण्यात येणार आहे. 

कामाची वेळ : सध्या सुरू असलेल्या कामाच्या वेळेत बदल करून इलेवेटर विभागासाठी 460 मिनिटे कामाऐवजी 470 मिनिटे काम करण्याचे युनियन ने मान्य केले आहे.

सॅलरी अँडव्हान्स : आपत्कालीन परिस्थिती मध्ये आर्थिक अडचण निर्माण झाल्यास,युनियन च्या एकूण सभासद संख्येच्या जास्तीत जास्त 20% सभासदांना दरवर्षी त्यांच्या ग्रॉस पगाराच्या दीडपट उचल देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

कायझन : युनियन ने कंपनी मध्ये निरंतर सुधारणा होण्यासाठी दर तिमाही मध्ये 1 कायझन व दोन सजेशन देण्याचे मान्य केले आहे.

    करार स्वाक्षरी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापना कडून कुलबीर सिंग (CSCO), पार्थ कुलकर्णी (HR व्हॉइस प्रेसिडेंट), आशुतोष शेळके,संजय दास, भगवान झा,प्रशांत माथूर,अश्विनी माळी,पार्वती प्रदीप,स्वप्नील पर्वतवार इत्यादी उपस्थित होते. तसेच युनियन तर्फे अध्यक्ष निलेश तानकर, उपाध्यक्ष अमोल देशमुख, जनरल सेक्रेटरी प्रवीण कांबळे, खजिनदार राहुल काळे, सह जनरल सेक्रेटरी सुबोध पवार, सदस्य विजय सुक्रे, उपस्थित होते.

वेतन करार यशस्वीरिता संपन्न होण्यासाठी श्रमिक एकता महासंघ यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले.