पगार न मिळाल्यामुळे कामगारांचा उद्रेक

 

बेंगळुरू : कर्नाटक मधील बेंगळुरू जवळील नरसापूर औद्दोगिक क्षेत्रामध्ये कार्यरत तैवान (Taiwan) ची Wistron कंपनी मध्ये  iPhone चे उत्पादन केले जाते. 

         या कंपनी मधील कामगारांना मागील काहि महिन्यापासुन पगार मिळत नसल्यामुळे कामगारांमध्ये नैराश्य व चीड निर्माण होउन शनिवारी सकाळी कामगार यांंच्याकडून कंपनीमध्ये काही प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

        कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यामुळे तत्काळ पोलिस तेथे पोहचले व परिस्थिती वरती नियंत्रण आणले.