रांजणगाव,पुणे : रांजणगाव एमआयडीसी मधील ब्रिटानिया कंपनी च्या जागी बॉम्बे डाईंग कंपनी कार्यरत होती. सन २०१६ मध्ये बॉम्बे डाईंग कंपनी व्यवस्थापनाने कंपनी चालवणे परवडत नाही असे कामगारांना सांगून स्वेच्छा निवृत्ती योजना (VRS) घेण्यास सांगितले. त्यानुसार सर्व १६० कामगारांनी स्वेच्छा निवृत्ती योजना (VRS) मध्ये सहभाग घेतला. स्वेच्छा निवृत्ती योजना रक्कम देताना कंपनी व्यवस्थापन यांनी ७ कामगारांना जास्त रक्कम दिली. अशी माहिती मोरेश्वर भोसले, सचिन कुरुंदळे, विनायक वाखारे, नितीन घावटे, लक्ष्मण पवार यांनी दिली
त्यानंतर ठराविक कालावधी नंतर त्याच ठिकाणी बॉम्बे डाईंग कंपनीची सिस्टर कंपनी ब्रिटानिया चालू करण्यात आली. त्यामध्ये कामगार भरती चालू असून त्या ठिकाणी या सर्व १६० कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा तसेच सर्व कामगारांना स्वेच्छा निवृत्ती योजना मधील फरक रक्कम मिळावी. या मागणीसाठी सर्व कामगारांनी संजय पाचंगे, जिल्हाध्यक्ष, भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा (ग्रामीण) यांची भेट घेतली.
"कामगारांना वरती झालेला आर्थिक अन्याय दूर करून तसेच सर्व १६० कामगारांना पुन्हा रोजगार मिळावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार."
- श्री.संजय पाचंगे
जिल्हाध्यक्ष, भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा (ग्रामीण)