अतुल थिटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कार्यकारणी सदस्य पदी निवड

रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी मधील सुप्रीम ट्रिव्हज कामगार युनियन अध्यक्ष अतुल थिटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली.

         यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, सरचिटणीस सचिन गोळे,परशुराम साळवी, रामेशजी राणे तसेच युनियन प्रतिनिधी संजय दौंडकर, संदिप चत्तर, अनिल तुपेरे, किशोर समशेर, अरविंद दौंडकर, प्रवीण वामन हे सर्व कामगार बंधू उपस्थित होते.

"सन्मानीय राज साहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली व सन्मानीय सचिनजी गोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे ध्येय व धोरणे सर्व सामान्य मराठी माणसापर्यंत पोहचवणे आणि संघटित व असंघटित घटकामधील सर्व कामगारा पर्यंत पोहचणे व त्यांना न्याय मिळवून देणे हे प्रमुख कामे अगदी चोखपणे पार पाडणार " 
- अतुल थिटे, 
कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना
अध्यक्ष, सुप्रीम ट्रिव्हज कामगार युनियन