कोल्हापूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट (NIPM) – पिंपरी-चिंचवड-चाकण (PCC) चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension System – NPS) आणि नवीन कामगार संहिता (New Labour Codes) या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर विशेष परिसंवादाचे आयोजन रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता, हॉटेल द फर्न, कोल्हापूर येथे करण्यात आले.
Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA), HR Forum India, SMAK आणि HR Milap यांच्या सहकार्याने आयोजित या परिसंवादास कोल्हापूर व परिसरातील विविध औद्योगिक आस्थापनांमधील 225 हून अधिक मनुष्यबळ विकास अधिकारी तसेच व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दोन विविध कार्यक्रम व चर्चासत्रे आयोजित केल्याने या सर्व संयुक्तिक संस्थांच्या पदाधिकारी तसेच सदस्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रभावी निवृत्ती नियोजन, राष्ट्रीय पेन्शन योजनेचे फायदे, उपलब्ध गुंतवणूक पर्याय, दीर्घकालीन आर्थिक नियोजन तसेच उद्योग क्षेत्रासमोरील बदलती कायदेशीर आव्हाने याबाबत HR व्यावसायिकांना अद्ययावत माहिती मिळावी, हा या परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता. परिसंवादातील National Pension System (NPS) विषयावरील विशेष सत्रात श्री अजिंक्य देशपांडे असिस्टंट मॅनेजर पी एफ आर डी ए, श्री. केदार सालवेकर, Senior Vice President, UTI Pension Fund आणि Regional Head – West, यांनी मार्गदर्शन केले.
श्री. सालवेकर यांनी NPS ची वैशिष्ट्ये, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन, कर्मचारी व नियोक्त्यांसाठी उपलब्ध लाभ, गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी नियोजनाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक सत्रामुळे उपस्थित HR व्यावसायिकांना NPS आणि निवृत्ती नियोजनाच्या विविध पैलूंबाबत अधिक स्पष्टता मिळाली. प्रश्नोत्तरांच्या सत्रात उपस्थितांनी विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांशी थेट संवाद साधला. KPMG च्या मिस अनिश्या यांनीही NPS व संबंधित आर्थिक नियोजनाच्या विषयावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.
परिसंवादातील दुसरा महत्त्वपूर्ण विषय New Labour Codes हा होता. बदलत्या कामगार कायद्यांच्या पार्श्वभूमीवर उद्योग व HR क्षेत्रावर होणारे संभाव्य परिणाम, अनुपालनातील बदल, कर्मचारी संबंध, वेतन व सामाजिक सुरक्षा तसेच HR व्यावसायिकांच्या बदलत्या भूमिकांवर तज्ज्ञांच्या पॅनेलमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
या पॅनेल चर्चेचे समन्वयन श्री. प्रणव बेहरे यांनी प्रभावीपणे केले. पॅनेलमध्ये श्री. दीपक जोशी, श्री. सत्यवान फडतरे, श्री. श्रीकृष्ण गंधे आणि श्री. हरीश सैवे यांनी सहभाग घेत आपल्या अनुभवांच्या आधारे विविध व्यावहारिक पैलूंवर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे चर्चेला अधिक व्यापक आणि संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये HR Forum India चे विशेष सहकार्य लाभले. श्री. रवींद्र जगदाळे, श्री. संजय बेणके, श्री. अनंत पाटील, श्री. संग्राम पाटील, श्री. संदीप सावंत, श्री. संदीप देसाई, श्री. शरद देसाई, श्री. अमित पिसाळ आणि श्री. अमोल खाडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. श्री. अनंत पाटील यांनी केलेले प्रभावी सूत्रसंचालन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
NIPM PCC चॅप्टरचे संस्थापक श्री. अमोल कागवाडे, अध्यक्ष श्री. प्रदीप मानेकर, सचिव श्री. नवनाथ सूर्यवंशी आणि उपाध्यक्ष श्री. अर्जुन माने यांनी उपस्थित HR प्रतिनिधी व व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. HR क्षेत्रातील ज्ञानवृद्धी, व्यावसायिक विकास, कर्मचारी कल्याण आणि उद्योगाच्या बदलत्या गरजांशी संबंधित उपक्रमांमध्ये HR व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यावर त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी SMAK चे अध्यक्ष श्री. राजू पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी त्यांनी आपले मौल्यवान विचार मांडले तसेच SMAKच्या सुविधांचा NIPM PCC ने त्यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे NIPM PCC Executive Committee च्या सदस्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. श्री. अमित देशपांडे, श्री. राहुल निंबाळकर, श्री. आप्पा मोरे, श्री. रमेश बागल, श्री. राजन पाटील, श्री. दत्ता पवार, श्री. राजू महानवर, श्री. विजय पाटील, श्री. मधुकर सूर्यवंशी, श्री. दीपक पाटील, श्री. विशाल भालेराव, श्री. अक्षय शिंदे, श्री. सुयोग धवळे, श्री. किरण मोहकर, श्री. सूरज पोळ आणि श्री. शरद सांडभोर तसेच पुणे, शिरवळ आणि सातारा परिसरातील NIPM PCC टीमच्या अनेक सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले.
NPS Team, PFRDA आणि KPMG यांचेही कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांमुळे उपस्थितांना NPS, निवृत्ती नियोजन आणि संबंधित आर्थिक बाबींबाबत अधिक स्पष्टता मिळाली.
कार्यक्रमास मिळालेला 225 हून अधिक HR व्यावसायिकांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध आणि लक्षपूर्वक उपस्थिती, विषयांची उपयुक्त मांडणी, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध संस्थांच्या समन्वयातून झालेली प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा परिसंवाद विशेष ठरला.
NIPM PCC चॅप्टरच्या वतीने भविष्यातही HR व्यावसायिकांच्या ज्ञानवृद्धी, कर्मचारी कल्याण, व्यावसायिक विकास आणि उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजांशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एकत्रित प्रयत्न, ज्ञानाची देवाणघेवाण आणि HR क्षेत्राच्या विकासासाठीची बांधिलकी यामुळे कोल्हापुरातील हा परिसंवाद NIPM PCC च्या उपक्रमांमध्ये एक उल्लेखनीय पर्व ठरला. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता एचआर फोरम, SMAK, एचआर मिलाफ व एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर यांच्या सह श्री संजय बेनके, संग्राम पाटील, क्षितिज शिंपी, व संदीप सावंत यांनी परिश्रम घेतले तसेच भविष्यात असे संयुक्तिकरित्या कोल्हापूर येथे कार्यक्रम घेण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.


