तळोजा : येथील Resins & Plastics Limited कंपनी व्यवस्थापन व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांच्यातील चार्टर ऑफ डिमांड्स संदर्भातील कामगारांच्या मागण्यांवर अनेक बैठकीनंतर दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी सामंजस्याने ऐतिहासिक 19000/- चा वेतनवाढ करार करण्यात आला आहे.
या करारनाम्याच्या स्वाक्षरी प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष श्री मनोज चव्हाण , सरचिटणीस संतोष धुरी , उपाध्यक्ष यशवंत हाडगे , दिनेश चव्हाण , पनवेल शहर अध्यक्ष योगेश चिले तसेच पनवेल शहर पदाधिकारी युनिट अध्यक्ष प्रशांत वसईकर आणि कमिटी मेंबर व्यवस्थापनातर्फे ललित जोशी , रवी सर आणि कामगार उपस्थित होते .
हा करार 01 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2028 या चार वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून कामगारांच्या वेतन, भत्ते, सुविधा, बोनस, शिफ्ट वर्किंग, सुरक्षा मानदंड, कार्यप्रणाली, सुट्ट्या व इतर सर्व सेवा अटींमध्ये महत्वाचे सुधार आणणारा आहे.
करारातील प्रमुख मुद्दे :
– 2025 ते 2028 या चार वर्षांसाठी 19000/- मूलभूत वेतन संरचनेत सुधारणा.
– वार्षिक वाढ पूर्वीप्रमाणे लागू.
– घरभाडे भत्ता, शिक्षण भत्ता, LTA, स्थानिक प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता यामध्ये लक्षणीय वाढ.
– ESI अंतर्गत असलेल्या व नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र तरतुदी.
– 2024–25 ते 2027–28 या चार वर्षांसाठी वाढीव बोनस/एक्स-ग्रेशिया.
– दरवर्षी दिवाळीपूर्वी वाटप.
– शिफ्ट वर्किंगची सध्याची रचना कायम.
– वार्षिक पिकनिक/पूजा HR च्या माध्यमातून.
– सेफ्टी शूज, रेनकोट/अम्ब्रेला सुविधा चालू.
– ऑपरेटर वर्क-नॉर्म्स, उत्पादकता, सुरक्षा मानदंड आणि IMS नियमांची सक्ती.
– मोबाइल वापर, PPE, ड्युटीवरील झोप यावर कडक कारवाईची तरतूद.
– सतत चालू राहणारी उत्पादन प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी समन्वय.
– सध्याची सुट्टी रचना कायम.
– Privilege Leave संचय मर्यादा 75 दिवसांपर्यंत.
– 2025 साठी अतिरिक्त PL चे एकदाच रोख रुपात देयक.
– उत्पादनातील सुधारणा, आधुनिकीकरण, नवीन मशिनरी/प्रक्रिया यात कामगारांचा पूर्ण सहभाग.
– पुढील चार वर्षे कोणत्याही नवीन आर्थिक मागण्या न करण्याची परस्पर सहमती.
“हा करार कामगारांच्या हिताचे सर्व मुद्दे संरक्षित करणारा, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रगती करणारा आहे. व्यवस्थापन व युनियनने परस्पर सामंजस्याने एक आदर्श समाधानाचा मार्ग शोधला आहे. यामुळे तळोजा युनिटच्या स्थिरतेत आणि उत्पादनक्षमतेत मोठी वाढ होईल.”


