पुणे : तळेगाव MIDC येथील FEV इंडिया प्रायव्हेट लिमि. (Fev India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन व शिवक्रांती कामगार संघटना यांच्यामध्ये त्रैवार्षिक वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची वैशिष्ट्ये खलील प्रमाणे -
कराराचा कालावधी : हा तीन वर्षे दि.01/04/2024 ते 31/03/2027 पर्यंत असा असणार आहे.
वेतनवाढीचे टप्पे पुढीलप्रमाणे
पहिल्या वर्षी - 50%
दुसऱ्या वर्षी - 20%
तिसऱ्या वर्षी - 30% या प्रमाणे देण्याचे मान्य करण्यात आले.
या पगारवाढीमुळे जवळपास सर्व कामगारांची CTC 10 लाख ते 11 लाख यादरम्यान झालेली आहे.
तसेच आत्तापर्यंत 19 महिने due झाले आहेत. त्यामध्ये फरकाची अमाऊंट 12 महिन्याची 50% आणि उरलेल्या 7 महिन्याची 20 % प्रमाणे रक्कम जमा करण्याचे मान्य केले आहे.
तसेच यूनियन मधील कामगारांना वार्षिक सुट्ट्या पुर्वी प्रमाणे आणि हक्काच्या राजा PL 21 आणि SL 7 अश्या पूर्वी प्रमाणे मान्य करण्यात आल्या.
मेडिकल पॉलिसी ही पुर्वी प्रमाणे राहील.
वार्षिक holiday 13 राहतील.
बोनस : Salary च्या ग्रॉस प्रमाणे देण्याचे मान्य केले आहे.
करारावरती व्यवस्थापन प्रतिनिधी सुशिल बेरी (मॅनेजिंग डारेक्टर), अनु सेठी मॅडम (एच.आर.हेड), निखिल वासेकर, मानसिंग यादव तसेच शिवक्रांती कामगार संघटना प्रतिनिधी सरचिटणीस विजयराव पाळेकर, वरिष्ठ चिटणीस गुलाबराव मराठे, खजिनदार रवींद्र साठे, संघटक प्रथमेश दादा पाळेकर, अभिजित वाघ, वकील माळेगावकर युनिट प्रतिनिधी अध्यक्ष संतोष भानुसे, उपाध्यक्ष महेश अपशिंगे, खजिनदार सत्यजित परदेशी, सरचिटणीस अमोल आठाळे, सदस्य देविदास वाघ, अमोल कराड, संतोष भुते हे उपस्थित होते.
हा वेतन करार आमच्या सर्वासाठी खुपच महत्वपूर्ण आणि निर्णायक होता, परिस्थिती खुप अवघड होती परंतु मित्रांनो ही अशक्यप्राय गोष्ट फक्त आदरणीय विजय रावजी पाळेकर साहेब यांच्या अंगी कामगार आणि त्यांच्या कुटुंबा- विषयी असलेल्या प्रेमापोटी शक्य झाली अशी माहिती कामगार संघटनेने दिली.
