विसाका इंडस्ट्रीज लिमिटेड (Visaka Industries Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

दौंड,पुणे : देलवडी तालुका- दौंड येथील विसाका इंडस्ट्रीज लिमिटेड (Visaka Industries Limited) कंपनी व्यवस्थापन आणि जय - मल्हार जनरल कामगार संघटना यांच्यामध्ये दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी द्वितीय त्रैवार्षिक वेतनवाढ करार संपन्न झाला. सदर करार यशस्वी करण्यासाठी आमदार राहुल दादा कुल याचे मोलाचे सहकार्य मिळाले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

कराराची वैशिष्ट्ये खलील प्रमाणे :

कराराचा कालावधी : हा तीन वर्षे दि.01/10/2024 ते 30/09/2027 पर्यंत असा असणार आहे.

वेतनवाढ : तीन वर्षासाठी रू.8200/- ( रु आठ हजार दोनशे) वेतनवाढ करण्यात आली.
वेतनवाढीचे टप्पे पुढीलप्रमाणे 
पहिल्या वर्षी - 60% 
दुसऱ्या वर्षी - 20% 
तिसऱ्या वर्षी - 20% या प्रमाणे देण्याचे मान्य करण्यात आले.

करार फरक रक्कम : 13 महिन्याची करार फरक रक्कम एकरकमी देण्यात येणार आहे.

मेडिक्लेम पॉलिसी : रुपये 3 लाख करण्यात आली.

नाईट शिफ्ट अलाउन्स रुपये 15/- करण्यात आला.

पूर्ण 26 दिवस हजेरी भरल्यास रु. 260/- देण्यात येणार आहेत.

दरवर्षी प्रत्येक कामगार यास टी शर्ट, तीन वर्षात एकदा जर्किंग तसेच प्रत्येक महिन्याला 2 धुण्याचे साबण व 1 अंगाचा साबण देण्यात येणार आहे.

    कराराच्या वेळेस कंपणी व्यवस्थापनचे वतीने प्रसाद सर, सत्यम सर, महाजन सर, आशीष सर, नाईक सर तसेच कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदिप शेलार, सचिव हनुमंत टुले, सुरेश शेलार, संभाजी शेलार, शंकर मदने, महेद्र लव्हटे, अक्षय वाघोले, समीर दोरगे, सतोष भीकुले हे उपस्थित होते. सर्व कामगारांनी संघटनेवरती दाखविलेल्या विश्वासाबद्दल संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.