एशियन पेंट्स लि. (Asian Paints Ltd.) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : मरकळ रोड मु पो. धानोरे ता-खेड, जि पुणे येथील एशियन पेंट्स लि. (Asian Paints Ltd.) कंपनीतील कामगारांच्या वतीने शिवछ‌त्रपती शिवाजी काम‌गार संघटनेचे मार्फत मागणीपत्रक सादर केले होते. सदर मागणीपत्रकावर मा. सहायक कामगार आयुक्त श्री कैलास मुजुमले यांच्या समोर समेट कार्यवाही झाली. दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी  उभयपक्षांनी वेतन वाढ करारावर सहया केल्या.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे - 

करार कालावधी : सदर करार 01/09/2025 पासून पुढील तीन वर्षासाठी.

पगार वाढ : रु.10,000/- (त्यापैकी 50%, मुळ पगार आणि 50% इतर भत्त्यामध्ये)

फॅमिली इन्शुरन्स : रु. चार लाख रुपये

बोनस : पहिल्या वर्षी - रु.36,000/-, दुसऱ्या वर्षी 37,500/- व तिसऱ्या वर्षी 39,500/- बोनस मिळणार आहे.

दरवषी फॅमिली स्नेहसंमेलने, वार्षिक सहल,  क्रिकेट मॅचेस

    या करारावर व्यवस्थापनाच्या वतीने सुरेश के. एम. रुचीत टाकुरिया, अविनाश सुकळकर, मनोज क्षीरसागर (सिनि. प्रिन्सिपल स्पेशालिस्ट) व श्री. ऋषिकेश गिरमे (एच आर मॅनेजर) तसेच संघटनेच्या वतीने श्री महेश काकडे (अध्यक्ष), श्री योगेश काकडे (जन.सेक्रेटरी), श्री अनिल कदम (उपाध्यक्ष), श्री गणेश‌ काकडे (सचिव) कामगार नेते श्री.रामचंद्र शरमाळे (कायदेशिर सल्लागार), अजय गावडे (युनिट अध्यक्ष), श्री अरविंद गावडे (युनिट उपाध्यक्ष),तसेच सहाय्य्क कामगार आयुक्त श्री कैलास मुजुमले यांनी सह्या केल्या.