'कामगार नामा' आज सहावा वर्धापनदिन, आता 'कामगार नामा' मॅगझीन स्वरूपात - बुकिंग सुरु

पुणे : आज दसरा याच शुभ मुहुर्तावरती 'कामगार नामा' ची सुरवात दि. 8 ऑक्टोबर 2019 रोजी  करण्यात आली. आज 'कामगार नामा' चा सहावा वर्धापन दिन आहे. www.kamgarnama.com हे ऑनलाईन न्यूज पोर्टल द्वारे सर्व प्रकारच्या संघटित / असंघटित कामगार विषयी बातम्या, कामगार कायदे ओळख, विविध कंपनी मध्ये होणारे वेतनवाढ करार, विविध शासकीय योजना, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ योजना व विविध माहिती रोज प्रसिद्ध करण्यात येते. या माध्यमातून राज्यातील लाखो कामगार यांच्यापर्यंत माहिती जाते आज रोजी या पोर्टलला 96 लाखाहून अधिक views झाले आहेत.

        सहावा वर्धापन दिन साजरा करताना व दसरा मुहूर्तावर  'कामगार नामा' मॅगझीन स्वरूपात द्विमासिक (दोन महिन्यातून एकदा) प्रसिद्ध करण्यात येणार असून या मॅगझीन मध्ये सर्व प्रकारचे संघटीत, असंघटीत कामगार / कर्मचारी, एच. आर., कामगार क्षेत्रामध्ये कार्यरत संघटना, पदाधिकारी यांच्या करिता -
  • कामगार कायदे विषयक माहिती
  • कामगार विषयक विविध न्यायालय निकाल माहिती
  • विविध कंपनीचे वेतन करार
  • महागाई भत्ता विषयक माहिती, परिपत्रक
  • महाराष्ट्र शासनाचे कामगार विभाग, विविध कामगार मंडळ माहिती
  • कामगार विषयक शासन निर्णय, विविध परिपत्रके
  • कामगार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शनपर लेख
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO), कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC), महा. कामगार कल्याण मंडळ (MLWB) विविध योजना, उपक्रम विषयक माहिती
"कामगार नामा" मॅगझीन प्राप्त करण्यासाठी वार्षिक वर्गणी रु. 600/- (पोस्टींग चार्ज सहित)
एका वर्षात 6 मॅगझीन मिळतील. (2 महिन्यातून 1 या प्रमाणे)
Phone Pe - 8983070380 करा किंवा वरील Image मधील कोड स्कॅन करा.

टीप : पेमेंट केल्यानंतर संपुर्ण नाव, पत्ता (पिन कोड सहीत), मोबाईल नंबर माहिती 8983070380 या नंबर वर कळविणे. किंवा https://forms.gle/1TTWmMiSS2Zr5GFi6 लिंक वरती माहिती भरा. माहे नोव्हेंबर 2025 पासून मॅगझीन प्रकाशित होईल.

"कामगार नामा" मॅगझीनचे वार्षिक वर्गणीदार व्हा ! या चळवळीस हातभार लावा !

 'कामगार नामा' एक घेतलेला आढावा

     'कामगार नामा' चे संस्थापक संपादक व मुख्य समन्वयक श्री भूषण विजय कडेकर यांचे शिरूर,पुणे हे गाव. कामगार क्षेत्रामध्ये 15 वर्षे कामगार म्हणून विविध कंपनी मध्ये काम केले. यामध्ये टाटा मोटर्स पुणे, व्हील्स इंडिया, Whirlpool रांजणगाव, बॉम्बे डाईंग कंपनी रांजणगाव एमआयडीसी मध्ये 10 वर्ष काम करत असताना कामगार प्रतिनिधी म्हणून 6 वर्ष काम पाहिले.

    कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना विविध कामगार कायदे, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचा अभ्यास केला. त्यांना एक खंत होती कि कामगार यांच्यासाठी परिपूर्ण माहिती देणारे वृत्तपत्र नाही म्हणून "दसरा" मुहूर्तावर दि. 8 ऑक्टोबर 2019 रोजी  'कामगार नामा' मासिक प्रथम चालू केले. 

    त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये प्रिंटिंग बंद असल्यामुळे मासिक छापण्यास अडचणी आल्या यावरती मात करत दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी “दिवाळी पाडवा” मुहूर्तावर www.kamgarnama.com हे ऑनलाईन न्यूज पोर्टल चालू केले. या वेब पोर्टल वरती सर्व प्रकारच्या संघटित / असंघटित कामगार विषयी बातम्या, कामगार कायदे ओळख, विविध कंपनी मध्ये होणारे वेतनवाढ करार, विविध शासकीय योजना, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ योजना व विविध माहिती रोज प्रसिद्ध करण्यात येते. या माध्यमातून राज्यातील लाखो कामगार यांच्यापर्यंत माहिती जाते आज रोजी या पोर्टलला 96 लाखाहून अधिक views झाले आहेत.

'कामगार नामा' ची उपलब्धी (Achievement) :  

       कामगार नामा कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडून कामगार क्षेत्रासाठी ऐतिहासिक कार्यवाही पार पाडण्यास भाग पाडले  

1) शासनाकडून दर सहामहिन्याला प्रसिद्ध होणारे विशेष महागाई पत्रक बरोबर किमान वेतन पत्रक प्रसिद्ध करत जावे यासाठी सुमारे 2.5 (अडीच) वर्ष शासनदरबारी, मंत्री महोदय यांच्या कडे पाठपुरवठा केला व याला दि. 1 फेब्रुवारी 2022 रोजी यश आले व कामगार आयुक्त कार्यालय यांनी विशेष महागाई पत्रक बरोबर किमान वेतन पत्रक प्रसिद्ध केले. यामुळे राज्यातील लाखो कामगार यांना आपण ज्या उद्योगात काम करतो तेथे किती किमान वेतन मिळायला पाहिजे याची माहिती मिळाली हि एक ऐतिहासिक घटना कामगार विश्वामध्ये घडली.

2) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या द्वारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबविल्या जातात आता यामध्ये 'शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) अर्थसहाय्य्य योजना' देखील लागू झाली, त्याबाबत कामगार कल्याण मंडळ यांचे परिपत्रक प्रसिद्ध केले असून याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो कामगार व कुटुंबियांना होणार आहे.

    कामगार नामा कृती समिती द्वारे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणारे विविध  योजनामध्ये 'शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) अर्थसहाय्य्य योजना' राबवावी अशी मागणी दि.१०/०६/२०२२ पासून सातत्याने करण्यात येत होती तसेच त्याबाबत पाठपुरवठा देखील करण्यात येत होता.

3) असंघटित कामगारांना ते ज्या उद्योगामध्ये काम करतात तेथे किमान वेतन मिळावे म्हणून मार्गदर्शन त्याचा लाभ हजारो कामगारांना झाला.

4) याच बरोबर अनुकंपा कृती समितीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील विविध नगरपालिका याची अनुकंपा नियुक्ती पात्र 36 उमेदवार याची यादी तयार करून त्यापैकी 24 उमेदवार यांना नेमणूक मिळाली.

सन्मान : 

1) दि. 1 मे 2022 रोजी “कामगार दिन” रोजी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ याच्या द्वारे ‘कै. भाई वैद्य स्मृती पुरस्कार 2022’

2) दि. 1 मे 2022 रोजी “कामगार दिन” रोजी श्रमिक एकता महासंघ याच्या द्वारे ‘विशेष कार्याबद्दल सन्मानचिन्ह’

3) दि. 3 जून 2023 रोजी पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात कामगार क्षेत्रामध्ये करत असलेल्या कार्याबद्दल राष्ट्रीय श्रमिक आघाडी यांच्या कडून "विशेष सन्मान"

4) दि. 15 मार्च 2025 रोजी “एनआयपीएम पिंपरी, चिंचवड, चाकण चॅप्टरच्या वतीने एनआयपीएम (NIPM) चा 45 वा वर्धापन दिन” निमित्त कामगार क्षेत्रामध्ये करत असलेल्या कार्याबद्दल विशेष सन्मान

5) दि. 27 एप्रिल 2025 रोजी “आयटीसी कामगार संघटना यांच्या वतीने कामगार क्षेत्रामध्ये करत असलेल्या कार्याबद्दल विशेष सन्मान 

कार्यरत व पुढील नियोजन : 

१) महाराष्ट्र राज्यामध्ये विधानपरिषदेवर पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघ धर्तीवर कामगार मतदार संघ निर्माण करून त्यामधून विभागाप्रमाणे आमदार प्रतिनिधी निवडून देण्याची तरतूद समाविष्ठ करण्यासाठी प्रयत्न 

2) 'कामगार नामा' च्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कामगार मध्ये विविध कामगार कायदे, विविध कामगार विषयक योजना, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ याविषयी संघटित व असंघटित कामगार यांच्यामध्ये जागरूकता (Awareness) आणणे.

3) असंघटित कामगार यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळावा यासाठी प्रयत्न.