छत्रपती संभाजीनगर : लक्ष्मीअग्नी कंपोनंट अँड फोर्जिंग प्रा.लिमि. (Laxmi-Agni Components & Forgings Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि छत्रपती संभाजीनगर युनियन सीटू यांच्या मध्ये दि.27/09/2025 रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला.
हा करार तीन वर्षाचा करण्यात आला असून पगारवाढ रु.8300/- करण्यात आली आहे. मागील तीन महिन्याचा फरक देण्याचे मान्य केले आहे,कायद्यानुसार दिवाळी बोनस देण्याचे मान्य केले. एक कामगार मागील 22 महिन्यापासून बाहेर होता तर त्यांना सोमवार दि.29/09/2025 पासून कामावर घेण्याचे मान्य करण्यात आले आहे.
या करारासाठी व्यवस्थापनाच्या वतीने एम.डी.श्री अभय कपूर, डायरेक्टर श्री धर्मेंद्र रामदाणी, एच आर हेड श्री जोशी, श्री कैलास कानोले तसेच युनियनच्या वतीने सीटू चे जेष्ठ कामगार नेते अध्यक्ष कॉ लक्ष्मण साक्रूडकर, स्थानिक युनियन प्रतिनिधी अध्यक्ष कॉ रामेश्वर तांबे, उपाध्यक्ष कॉ संजीव कुमार हुके, कॉ ज्ञानेश्वर पठाडे, कॉ रमेश तायडे, कॉ युनूस पहाडवाले यांच्यामध्ये करारावर सह्या केल्या.
सीटूचे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत केली व यांच्या मेहनतीला यश आले त्यामुळे या करारावर सह्या झाल्यानंतर कंपनीच्या गेटवर मॅनेजमेंट व सर्व युनियन पदाधिकारी कामगार यांनी कराराचे स्वागत करुन एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला.