नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (NIPM) राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये पुण्यातून तीन चेहरे

पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (NIPM) च्या द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये  2025-27 पुण्यातून यावेळेस तीन चेहरे पश्चिम विभागाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये बसू राजू यांच्या नेतृत्वातील पॅनलने घवघवीत यश मिळवून सर्वच्या सर्व जागांवरती विजय संपादन केला आहे. NIPM ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एच आर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाठी अविरत कार्यरत आहे. 

     NIPM च्या पुणे चॅप्टर मधून अमृता तेंडुलकर ह्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदासाठी निवडून आले असून श्री नरेंद्र पाटील हे पश्चिम भागाच्या उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. तर पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे श्री अभय खुरसाळे  हे राष्ट्र पश्चिम विभागाचे सदस्य म्हणून राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नेतृत्व करताना दिसणार आहेत. 

     NIPM च्या 2025- 27 च्या राष्ट्रीय कार्यकारणी चे अध्यक्ष म्हणून श्री बसवराजु निवडून आले असून उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. मुरलीधरराव उपाध्यक्ष, विश्वभूषण बेहरा सेक्रेटरी, रॉबर्ट कुटीनो ऍडिशनल जनरल सेक्रेटरी, श्री एलएनगो दक्षिण विभाग उपाध्यक्ष, श्री संजय ठाकूर पूर्व विभाग उपाध्यक्ष, सुहास बिरेवार मध्य विभाग उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत.