मुंबई : ओलॅन ऑक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडियंट्स (Olon Active Pharmaceutical Ingredients India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना यांच्या मध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :
या करारानुसार कर्मचाऱ्यांना 25 हजारांपासून 50 हजारांपर्यंत पगारवाढ झाली आहे.
कमाल वेतनवाढ 25,200 रुपये करण्यात आली आहे.
तर 15 वर्षे सेवा झालेल्यांना 25 हजार, 25 वर्षे सेवा झालेल्यांना 30 हजार आणि 30 वर्षे सेवा झालेल्यांना 50 हजारां पर्यंत पगार वाढ होणार आहे.
तर रिटायरमेंट ॲवॉर्ड म्हणून 1.25 लाख रुपये मिळणार आहेत.
कंपनीच्या मेडिकल पॉलिसीनुसार 40 वर्षां खालील कर्मचाऱ्यांना प्रतिवर्ष 2.50 लाख, तर 40 वर्षां वरील कर्मचाऱ्यांसाठी 5 लाख मिळणार आहे.
मेडिकल रजा प्रतिवर्ष 20 दिवस मिळणार आहे.
या पगारवाढीच्या करारावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, संयुक्त सरचिटणीस उदय शेटय़े, सहचिटणीस संतोष कदम यांनी तर कंपनीच्या वतीने इंडिया हेड पांचाळ, मॅनेजर गीते, कामगार प्रतिनिधी सुनील शिंदे, चंद्रकांत सावंत, भगवान कदम, विठ्ठल मोरे, विवेक कुंभार, संदीप सावंत यांनी सह्या केल्या. भारतीय कामगार सेनेच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे ही पगारवाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमधून शिवसेनेचे आभार मानले आहे.
भारतीय कामगार सेनेमुळे ही पगारवाढ मिळाल्याबद्दल कोकण औद्योगिक क्षेत्र आणि कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भरघोस पगारवाढ मिळाल्यामुळे सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेना आणि कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.