श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर सोमवंशी यांना राष्ट्रीय पुरस्कार

कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त "कर्माला ईश्वर मानणाऱ्या" विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मुख्य सभागृह शाहू स्मारक भवन,दसरा चौक,कोल्हापूर  येथे संपन्न झाला.

     यामध्ये “कामगार भूषण” राष्ट्रीय पुरस्कार २०२५ हा  प्रतिष्ठित पुरस्कार श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष तसेच थरमॅक्स कामगार संघटनेचे मा.अध्यक्ष श्री.किशोर सोमवंशी यांना देण्यात आला.

     यावेळी किशोर सोमवंशी म्हणाले कि,सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीमुळे सातत्यपूर्ण सर्वंकष, अभ्यासपूर्ण, समर्पक,संघर्षशील, कामगार हक्कासाठी दिलेल्या योगदानाला आणि निस्वार्थ कार्याला मिळालेले गौरव निश्चितच स्फूर्ती आणि प्रेरणा देणारा आहे.