छत्रपती संभाजी नगर : वाळुज एमआयडीसी येथील क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Curia India Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि छत्रपती संभाजी नगर सीटू युनियन तर्फे कामगारांच्या पगार वाढीसाठी दि 23 जुलै 2025 रोजी सकारात्मक चर्चा होऊन रु.19001/- रुपयाची पगार वाढ करण्याचा निर्णय व्यवस्थापन व युनियन मधे कामगार उपायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वी रित्या पुर्ण झाला आहे.
वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :
कालावधी :- 1 मे 2024 ते 30 एप्रिल 2027 (तीन वर्षे)
सर्व कामगारांना मागील 14 महिन्याचा पगार फरक व डि.ए.फरक 100%देण्याचे मान्य करण्यात आले आहे, प्रत्येक कामगारांना जवळपास रु.150000/- हजार ते रु.175000/- हजार फरकाची रक्कम मिळणार आहे ,
कॅन्टीन :- कॅन्टीन भत्यामध्ये रु.50/- रुपयाची वाढ करण्यात आली आहे.
दिवाळी बोनस :- दिवाळी बोनस मधे रु.2450/- रुपयाची वाढ करण्यात आली आहे ,(एकुण रुपये 32450/-) दिवाळी बोनस मिळणार आहे.
फेस्टिवल अँडव्हान्स :- फेस्टिवल अँडव्हान्समध्ये रु.10000/- हजाराची वाढ करण्यात आली आहे (एकुण ॲडव्हान्स रु.40000/-) मिळणार आहे,
शैक्षणिक कर्ज :- कामगारांना शैक्षणिक कर्ज बिगर व्याजी (रु.100000/-) एक लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
महागाई भत्ता :- डि.ए.मुंबई इंडेक्स मधे रु.2/- रुपये वरुन पर पाँइंट मधे 20 पैसे वाढ करण्यात आली आहे.
पेड हॉलीडे :- पेड हॉलीडे दिवशी जर कामगार कामावर आले तर त्यांना ओव्हर टाइम म्हणून मुळ वेतन व डि. ए.च्या 5 पट रक्कम ओव्हर टाईम म्हणून वाढ करण्यात आली आहे.
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हा करार रु.22000/- हजार रुपयाची वाढ कामगारांना मिळणार आहे ,
तसेच कामगारांचा अचानक किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास सर्व कामगार व कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार व त्या रकमेच्या तीन पट रक्कम कंपनी व्यवस्थापनाने ॲड करुन कामगारांच्या वारसांना देण्यात येणार आहे ,असे मान्य करण्यात आले आहे.
या करारावर उभय पक्षात चर्चा करून कामगार उपायुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे कामगार उपायुक्त नितीन पाटनकर,सहायक कामगार आयुक्त जी बी बोरसे यांच्या समोर मान्य करुन तसेच व्यवस्थापनाचे माननीय संचालक मनोज डोरलीकर, एच.आर.असोशियट डायरेक्टर आमना हुसैन, एच.आर.असिस्टंट मॅनेजर रविंद्र भागडे, सीटू युनियन तर्फे जेष्ठ कामगार नेते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण साकु्डकर, स्थानिक युनियन पदाधिकारी कॉ शेख चाँद, कॉ गोपेश कुमार राय, कॉ शिवाजी शिंदे, कॉ राजेंद्र मिसाळ, कॉ प्रभाकर गवळी, कॉ ईसाक सय्यद, कॉ भरत फासाटे यांनी या करारावर कामगार उपायुक्त कार्यालय येथे सह्या करण्यात आले आहे या कराराचे कामगारांनी मिठाई वाटून जल्लोषात स्वागत केले आहे.