लॉरियाल इंडिया प्रा. लिमि (Loreal India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण,पुणे : म्हाळुंगे येथील लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Loreal India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियन,संघटना यांच्यामध्ये ऐतिहासिक पाचवा वेतनवाढ करार दि.२८ मे २०२५ रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :

कालावधी :- १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२६ (तीन वर्षे)

एकूण सरासरी वेतनवाढ :- रु.२०,३३०/- (बेसिक, अलाउन्सेस, पी.एफ, बोनस, डब्लु.पी.एस, सानुग्रह अनुदान व ग्रॅज्युटी इ.)
पहिल्या वर्षी - ७,७११/-
दुसऱ्या वर्षी  - ६,७५०/-
तिसऱ्या वर्षी - ५,८६९/-
कसल्याहि प्रकारच्या उत्पादनाशी निगडित पगारवाढ नाही
सर्वांना समान पगार वाढ

वेतनातील फरक :- जानेवारी २०२४ पासुन मिळणार

रात्रपाळी भत्ता :-  प्रतिदिन रु.१५०/- 

सेव्हन डे भत्ता :- प्रतिमहिना रु.१,२७०/-

पाळणाघर भत्ता :- ६ महिने ते ६ वर्षांपर्यंत महिला कामगारांच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी रु.७५००/-महिना

लाॅरियाल जागतिक नफा वाटप योजना पॉलिसीनुसार दिड आठवड्यांचा पगार हा सी.टी.सी. चा भाग राहणार आहे. दिड पासून पुढे साडे तीन आठवड्यापर्यंत जर डिक्लेअर झाला तर तो आऊट ऑफ सी.टी.सी.चा भाग राहणार आहे. मागील करारानुसार दोन आठवड्याचा असलेला सीटीसीचा भाग व या करारात मान्य झालेला दीड आठवड्याचा सीटीसीचा भाग यात राहिलेला 0.5 आठवड्याचा भाग हा विशेष भत्तामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.

बोनस :- वार्षिक बेसिकच्या ८.३३% प्रत्येक आर्थिक वर्षानुसार दिवाळीत मिळणार

भविष्य निर्वाह निधी :- कायद्यानुसार मिळणार त्याचबरोबर ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी स्वेच्छेने सुरू करू शकणार आहेत.

उपदान कायद्यानुसार व (ग्रॅच्युइटी) आऊट ऑफ सीटिसी :- 
सानुग्रह अनुदान  उपदान ही आऊट ऑफ सी.टी.सी.करण्यात संघटनेला यश आल्यामुळे मागील स्ट्रक्चरमधील उपदानाची रक्कम  प्रत्येक वर्षीच्या दिवाळी बोनस बरोबर सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार आहे.

जादा कामाचा मोबदला :- मासिक पुर्ण पगाराच्या दुप्पट मिळणार आहे.
साप्ताहिक सुट्टी च्या दिवशी जादा काम केले तर एकतर सी ऑफ किंवा जादा कामाचा दुप्पट मोबदला मिळणार.
पगारी सुट्टीच्या दिवशी जादा काम केल्यावर तिप्पट रेटने जादा कामाचा मोबदला व एक सी ऑफ मिळणार

वार्षिक रजा ( Annual Leave) :- ०३-३३पर्यंत(प्रत्यक्ष हजर दिवसा प्रमाणे)
वार्षिक रजेची साठवणुक :-  १०० दिवस
वार्षिक रजेचे रोखिकरण - १०० रजांच्या च्या पुढिल १५ दिवसांचे पुर्ण पगारावर मिळणार.
(वार्षिक रजेच्या कॅल्क्युलेशन मध्ये मातृत्व रजा, सामुहिक अपघात विमा रजा, गंभीर स्वरूपाच्या आजार योजनेतील रजेचे दिवस हे प्रत्यक्ष हजर दिवस ग्राह्य धरले जातील)

वैद्यकीय सेवा रजा ;- १० दिवस
वैद्यकीय सेवा रजा साठवणूक  ३० दिवसांपर्यंत 

सार्वजनिक पगारी सुट्टी :- १३ दिवस

शॉर्ट लिव्ह :- मागील करारातील तरतुदीप्रमाणे शॉर्ट लिव्ह मिळण्याची सुविधा सुरू राहील.

पितृत्व रजा :- ६ आठवडे, एका वर्षात दोन टप्प्यांत घेऊ शकणार आहे, अपत्याचे कोणतेही बंधन असणार नाही.

मातृत्व रजा :-  ७ महिने
 क्रिटिकल परिस्थितीमध्ये डाॅक्टरच्या सल्ल्याने अतिरिक्त पगारी रजा मिळणार.
दोन पेक्षा जास्त अपत्यास १२ आठवड्यांची मातृत्व रजा
प्रसुतीनंतर बाळ दगावल्यास  ६० दिवसांची रजा
पूर्व प्रवास सहाय्य लाभ गरोदर महिलांसाठी जर कंपनीचा बसचा वापर करायचा नसेल तर सहाव्या महिन्यापासून प्रत्येक महिना दहा हजार रुपये पूर्वप्रवास सहाय्य लाभ मिळणार.

वंध्यत्व उपचारासाठी रजा IVF TRATMENT :- १० दिवस
Egg fridge/Harvesting - ३ दिवस
Vasetomi/tubectomy-१० दिवस

गर्भपात रजा :- ४२ दिवसांपर्यत

कंपनी अपघात रजा ;- कंपनीच्या आवारात अपघात झाल्यास संबंधित कामगाराला कंपनी डॉक्टरच्या सल्ल्याने पगारी रजा मिळणार.

मुले दत्तक व सरोगसी रजा :- मुले दत्तक किंवा सरोगसी केली तर वरिल मातृत्व व पितृत्व रजेप्रमाणे रजा मिळणार.

निधन/शोक/सात्वनादाखल रजा :- कामगाराच्या रक्ताच्या नात्यातील कोण मरण पावल्यास त्या कामगाराला सांत्वनादाखल २०२४-०६ दिवस,२०२५-०७ दिवस,२०२६-०८ दिवसाची रजा मिळणार.
(रक्तातील नात्यात प्रामुख्याने पती/पत्नी, आई-वडिल, सासु-सासरे, बहिण-भाऊ, मुले यांचा समावेश)

निवडणुक रजा :- लोकसभा व विधानसभेला पगारी सुट्टी. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या वेळी दोन तासांची शाॅर्ट लिव्ह मिळणार.  पोल एंजन्ट व निवडणुकित उभा राहिलेल्या कर्मचारी उमेदवारास एक पगारी सुट्टी मिळणार.

सबॉटिकल रजा :- स्वतःच्या शिक्षणासाठी किंवा आजारपणासाठी २ महिने ते १ वर्षे विनापगारी अधिकृत रजा मिळणार आहे.यावेळी सर्व मेडिक्लेम आणि इतर इन्शुरन्स सुविधा चालु राहणार आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन रजा :- भविष्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास परिस्थितीनुरुप योग्य निर्णय घेऊन रजा दिल्या जाणार.

गंभीर आजारपणाच्या रजा :- कमाल ९० दिवस 
(४५:४५:१०)(कंपनी:सर्व कामगार: संबंधित कामगार)या टक्केवारी नुसार)

बस सुविधा :- चालु बस स्टॉपमध्ये अजुन वाढ. कपातीमध्ये ५० रुपये दरमहा वाढ. 
आपत्कालीन वाहतूक सेवा कामगार कामावर उपस्थित असल्यावर वैयक्तिक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित वाहतूक सेवा उपलब्ध करून दिले जाईल.

कॅन्टीन :- मेनुमध्ये वाढ, दरमहा कामगार १५% व कंपनी ८५% कपात 

गणवेष :- प्रतिवर्षं दोन जोडी, शिलाई खर्च १०००/- प्रति जोडी   
टी शर्ट तीन वर्षांमध्ये २ जर्किंग तीन वर्षांमध्ये १
युटिलीतील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी रेनकोट,गनकोट हिवाळी जॅकेट देण्यात येणार

खेळ :- दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जातील. भाग घेणाऱ्या खेळाडुला टी शर्ट देण्यात येतील.तसेच कॅरम,चेस व बॅडमिंटन ह्या खेळांचाही समावेश.

सेफ्टी शूज व सेफ्टी गॉगल (नंबर असलेले ही) चांगल्या प्रतीचे वर्षातून दोन वेळा डोळ्यांची तपासणी केली जाणार. 

कौटुंबिक सांस्कृतिक महोत्सव (फॅमिली डे) :- कामगारांना तसेच परिवारातील सदस्यांसाठी (पती/पत्नी,अपत्य).या करारा द्वारे कामगारांच्या आई-वडिलांनाही कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रमात घेऊन येण्याचे मान्य 

दसरा सेलिब्रेशन :- खंडेनवमीला कंपनीच्या वेळेत दांडिया कार्यक्रम साजरा होईल.

मरणोत्तर सहाय्य निधी :- कायमस्वरूपी कामगार मृत पावल्यास कुटुंबीयांस मदत निधी म्हणून प्रत्येक कामगार दिड दिवसाचे पुर्ण वेतन आणि कामगारांची जी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम कंपनीने देण्याचे मान्य केले आहे.
त्याच प्रमाणे मृत कर्मचाऱ्याच्या दोन मुलांना बारावी पर्यंतच्या  शिक्षणासाठी प्रतिवर्ष १लाख याप्रमाणे कमाल ५ लाखांचे एकरकमी अर्थ सहाय्य.

वाचनालय :- नविन कामगार कायदे बदल कळण्यासाठी,इतर पुस्तके व पेपर वाचण्यासाठी वाचनायल चालु करण्याचे ठरले.

नवीन वर्षाची भेट :- दरवर्षी नवीन वर्षाचे  एक डायरी व एक पेन जानेवारी महिन्यात दिले जातील.

अंत्यसंस्कारप्रित्यर्थ खर्च :- कामगाराचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्यास जीपीएफ पॉलिसी नुसार वारसांना २५ हजार रुपये देण्यात येईल.
नैसर्गिक मृत्यू झाल्यास व्यवस्थापन स्वईच्छेनुसार नुसार मदत करेल.

कामगारांचे दिव्यांग पाल्य :-
कामगारांचे पाल्य दिव्यांग असेल तर व्यवस्थापनाच्या सहकार्याने आवश्यक ती मदत केली जाईल. 

कामगार प्रशिक्षण :- वर्षातून दोन दिवस कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल त्यातील एक दिवस कंपनी सुरक्षा, गुणवत्ता, स्वच्छता याबाबत व दुसरा दिवस कामगार कायदे या संदर्भात दिले जाईल ‌

कंपनी कौटुंबिक भेट :- कामगारांच्या कुटुंबासाठी कंपनी पाहण्यासाठी कंपनी भेट चालू करण्यात येईल.

राष्ट्रीय पेन्शन योजना :- ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल ती करता येणार आहे.

कंपनी उत्पादन :- कंपनीचे उत्पादन ज्या कर्मचाऱ्यांना पाहिजे असेल त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. 

रक्तदान व वृक्षरोपण :- संघटना वर्धापन दिन व कंपनी स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन केले जाईल व विशेष भोजन 

विवाह भेट :- कामगाराला स्वतःच्या लग्नासाठी महिन्याच्या मुळ वेतनच्या ५०% अमाउंट आणि कंपनी प्रॉडक्ट विवाह भेट
 तसेच कर्मचाऱ्याच्या मुला मुलीच्या लग्नासाठी कंपनी प्रॉडक्टचे गिफ्ट.

पारितोषिक :-
उत्तम हजेरी, सुरक्षा व सहभाग यासाठी तीन पारितोषिक.
२८५ दिवसापेक्षा जास्त दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक दिनाच्या दिवशी कौतुकाचे प्रतीक देऊन सन्मान केला जाईल. 
उत्पादनाची ध्येय गाठल्यानंतर कौतुकाचे प्रतीक देऊन सन्मान केला जाईल.
रिवार्ड व रिकग्निशन नवीन पॉलिसी चालु करण्यात येईल.

शिष्यवृत्ती योजना :- उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वर्षाला ५ विद्यार्थ्यांना रु.९०,०००/- (रु.नव्वद हजार) विना परतफेड देण्याची तरतूद करण्याचे मान्य.
दहावी व बारावी परीक्षांमध्ये ६०% च्या पुढे गुण मिळविणाऱ्या कामगार पाल्यांचा फॅमिली डे कार्यक्रमात सत्कार. व 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या कामगार पाल्यांचा कौतुकाचे प्रतीक देऊन सन्मान केला जाईल.
संगणक प्रशिक्षण स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण यांना मान्यता

फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी :- (स्वतः कामगार, पति/ पत्नी,दोन अपत्य २५ वर्षे पर्यत ) 
वार्षिक रु.४,००,०००/- 
प्रसुती खर्च ९०,०००/-
सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सदर मेडिक्लेम पाॕलिसीची सुविधा स्वतः प्रीमियम भरुन पुढे चालू ठेवता येणार आहे. निवृत्ती नंतरचे वय पाहता नवीन पॉलिसी मिळणेच शक्य नसल्याने ही व्यवस्था करण्यात संघटनेला यश आले आहे.
आई वडिलांची मेडिक्लेम पॉलिसी आई वडिलांची मेडिक्लेम पॉलिसी मागील कराराप्रमाणेच काढण्यात येईल.सुरवातीचा पुर्ण हप्ता कंपनी भरणार आहे व पुढिल १२ महिन्यात कामगारांच्या पगारातुन रिकव्हर केले जाणार आहे.

ग्रुप पर्सनल अँक्सीडेंट पॉलिसी ३५ लाख

ग्रुप टर्म इंशुरन्स पॉलिस - ३५ लाख (टर्मिनल आजारांसाठी ५० लाखांपर्यंत) 

वैद्यकीय तपासणी :- फॅक्टरी ॲक्ट १९४८ नुसार कामगारांची दरवर्षी कंपनीत वैद्यकीय तपासणी केली जाईल. 
सदर ॲक्ट मधील वैद्यकीय तपासणी तरतुदीव्यतिरिक्त खालील तपासण्या करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
थायरॉईड फंक्शन टेस्ट
टी एम टी/ 2D Echo
प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन 
अल्ट्रासोनोग्राफी अ‍ॅब्डॉमेन आणि पेल्विस
व्हिटॅमिन डी आणि बी 12
CEA - कॅन्सर संबंधित तपासणी
हाय सेन्सिटिव्हिटी सी रिॲक्टिव्ह प्रोटीन
PAP smear - कॅन्सर संबंधित तपासणी 
CA 125 - कॅन्सर संबंधित तपासणी 
मेमोग्राफी / सोनो मेमोग्राफी
तसेच त्या तपासणीत काही आढळले तर त्या पुढिल  टेस्ट  (सी.टी.स्कॕन,एम.आर.आय.) 
या टेस्टचा खर्च कंपनी करणार आहे. कामगाराची दोन वर्षातून एकदा बोन डेन्सिटी टेस्ट कॕम्प कंपनीत घेण्याचे उभयपक्षी मान्य

वाढदिवस :- कामगारांच्या वाढदिवसानिमित्त १ किलोचा माॕजेनिज केक, चाॅकलेट बाॅक्स, ग्रिटिंग व शाॅर्ट लिव्ह  मिळणार.

सॅलरी अ‍ॅडवान्स :- दर महिन्याला १,००,०००/- १२ महिन्याच्या परतफेडीवर प्रतिमहिना १० कामगारांना सॅलरी अ‍ॅडवान्स मिळणार. एप्रिल व मे महिन्यात शाळेची फी व लग्नकार्य असल्यामुळे या दोन महिन्यांत १४ कामगारांना सॅलरी अ‍ॅडवान्स मिळणार.

मेडिकल लोन  :- मेडिक्लेम पॉलिसीमधील तरतुदीनुसार मेडिक्लेम पॉलिसी लिमिट पूर्ण वापरून झाल्यानंतर उपचाराची आवश्यकता असल्यास सदर लोन सुविधा मिळेल. कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट साठी तीन महिन्याच्या बेस सॅलरी इतके मेडिकल लोन बिन व्याज मिळेल.

दिवाळीत जादा कामाला आल्यावर प्रत्येक दिवसासाठी  रु ८०० चे गिफ्ट कुपन व कंपनीची गाडी उपलब्ध नसल्यास बारा रुपये किलोमीटर प्रमाणे वाहतूक भत्ता दिला जाणार

दिर्घ सेवा पुरस्कार :- १५,२०,२५ व ३० वर्षे व निवृत्तीच्या वेळी सर्टीफिकेट पारितोषिक व योग्य भेटवस्तु देण्याचे उभयपक्षी मान्य.

सेवानिवृत्ती निमित्त भेट :- पूर्ण कुटुंबाबरोबर सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजन केले जाईल व किती वर्ष सेवा केली त्या प्रत्येक वर्षाला १००० हिशोबाने सेवानिवृत्त भेट म्हणून पैसे दिले जातील. उदाहरणार्थ २८ वर्षे सेवा केली असल्यास २८ हजार रुपये सेवा निवृत्ती भेट म्हणून देण्यात येईल.

मिठाई दसरा सणानिमित्त १ किलो काजु कतली व दिवाळीत १ किलो सुकामेवा.

पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल रूम व रेस्ट रूम उपलब्ध करून देण्याचे मान्य.

महिला दिन आणि रक्षाबंधन  सर्व कर्मचाऱ्यांना  कंपनी प्रॉडक्ट देण्याचे मान्य.

कंपनी शेअर्स वेळोवेळी कंपनीने डिक्लेअर केलेल्या पद्धतीनुसार कामगार कंपनीचे शेअर्स घेण्यास पात्र राहणार आहे.

कंपनी विक्रीचा परिणाम कोणत्याही कारणास्तव जर कंपनी विक्री झाली तर अशा व्यवहारामुळे कर्मचाऱ्यांचे हक्क, सुविधा आणि भविष्यातील रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही असे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.

कुटुंबातील व्यक्तींना नोकरीवर घेण्यास प्राधान्य कामगाराच्या मृत्यूच्या दुर्दैवी प्रसंगी, कंपनी सहानुभूतीच्या आधारावर, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र सदस्याला (पत्नी/पती किंवा मुले) रोजगार देण्याच्या शक्यतेचा विचार करेल. ही संधी केवळ आधार व मदतीसाठी दिली जाईल, आणि ती कोणत्याही रिक्त पदाच्या उपलब्धतेवर तसेच संबंधित पात्र व्यक्तीची आवश्यक पात्रता आणि शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यावर अवलंबून असेल.

या संदर्भात अंतिम निर्णय हा कंपनी व्यवस्थापनाचा असेल. तसेच कामगाराच्या नातेवाईकांना प्रशिक्षणार्थी व अप्रेंटिस मध्ये प्राधान्य दिले जाईल.

संघटना ऑफिस व वेळ संघटनेसाठी सर्व सोयी युक्त असे आॕफिस दिलेले आहे, मासिक मिटिंगसाठी महिन्यातुन एकदा सर्व पदाधिकार्यांनां टाईम ऑफ मिळणार आहे. तसेच इतर संघटना कामासाठी वेळ दिला जाणार आहे. व त्या कामासाठी जर वाहनाची आवश्यकता लागल्यास उपलब्धतेनुसार वाहन सुविधाही मिळणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या आवारात घेण्यास मान्यता मिळाली आहे.

चालू सुविधा सवलती ज्या चालू सुविधा व सवलती आहेत त्या तशाच चालू राहतील. 

बदली कंपनी सोडून इतरत्र बदली करताना त्या कर्मचाऱ्यांचे मत व संमती घेतल्याशिवाय केली जाणार नाही.

सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याची भावना कामगारांनीही व्यक्त केली. सदर प्रसंगी कर्मचाऱ्यांना करारातील तरतुदीनुसार टी-शर्ट वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी उल्हासित होऊन पेढे वाटप केले आणि नृत्य करून आनंद व्यक्त केला

    सदर करारावेळी कंपनीच्या वतीने प्लांट डायरेक्टर श्री. अमित गर्ग, एच.आर. प्रमुख श्री.संतोष कदम, फायनान्स हेड श्री. रॉबिन विजय, प्रोडक्शन हेड श्री. सत्या सिंह, क्वालिटी हेड श्री.संजीव कुमार, सिनी.मॅनेजर एच.आर.आशुतोष चतुर्वेदी, लॉजिस्टिक्स हेड कु.अर्चिता सोनवणे मॅडम, सेफ्टी हेड श्री. मयुर राऊत, एच आर मॅनेजर वेंडेल वेस्ली यांनी तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री.अविनाश वाडेकर, जनरल सेक्रेटरी श्री.गणेश बोचरे, खजिनदार श्री.रवि साबळे, उपाध्यक्ष श्री.निलेश पाटोळे, कार्याध्यक्ष श्री कमलेश गावडे, सहसचिव सौ रूपाली शिंदे व श्री मुकुंद म्हाळुंगकर, आणि कार्यकारणी सदस्य सौ श्रद्धा सरकार,श्री.अंकुश ताठे, श्री किशोर दाभाडे आणि श्री गणेश आरुडे यांनी व यांनी सह्या केल्या. साक्षीदार म्हणुन कंपनीच्या वतीने सौ. पूजा भागवत व सौ. कार्तिकी बानगुडे यांनी व संघटनेच्या वतीने श्री.दिलीप मांगेला आणि सौ. संध्या तांबट यांनी सह्या केल्या.

सदर करारासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, उपाध्यक्ष राजूअण्णा दरेकर, सेक्रेटरी गणेश जाधव यांचे व इतर अनेक संघटनांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेवर दृढ असा विश्वास दाखवल्याने आणि संयम पाळल्याने हे यश मिळाले आहे.