ब्रोझे इंडिया ऑटोमोटिव्ह सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड (Brose India Automotive Systems Pvt. Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : हिंजवडी येथील ब्रोझे इंडिया ऑटोमोटिव्ह सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड (Brose India Automotive Systems Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि शिवक्रांती कामगार संघटना यांच्या मध्ये पगारवाढीचा करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढीलप्रमाणे :

कालावधी : दि.1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2028 (चार वर्षे)

एकूण वेतनवाढ : रु.दरमहा 20,000/- 

मेडिक्लेम पॉलिसी : रु.1 लाखावरून 2 लाखांपर्यंत वाढ (स्वतः, आई-वडील, पत्नी व दोन मुलांचा समावेश), अतिरिक्त 3 लाख बफर पॉलिसी

टर्म इन्शुरन्स : रु.35 लाखांचा टर्म इन्शुरन्स

अपघाती विमा : रु.30 लाखांचा अपघाती विमा

रजा : दरवर्षी 2.5 रजेमध्ये वाढ, EL (संचित रजा) साठवण्याची मर्यादा 30 वरून 45 दिवसांपर्यंत वाढ

शैक्षणिक कर्ज : रु.50,000/- पर्यंत बिनव्याजी शैक्षणिक कर्ज

नव्याने दोन बस रूट सेवा सुरू

GTB प्रणालीत दोन्ही बाजूंनी सकारात्मक सुधारणा

सदर करार संघटनेतर्फे प्रमुख सरचिटणीस ॲड. विजय पाळेकर, खजिनदार रवींद्र साठे, चिटणीस गुलाबराव मराठे ब्रोझे इंडिया व्यवस्थापनातर्फे सुमित राजधन (प्लांट हेड), मंगेश पंढरीपांडे (असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट – HR), पंकज भारद्वाज (प्रोडक्शन मॅनेजर), कवी रेणुसे (HR मॅनेजर) स्थानिक समिती सदस्य राकेश सोनवणे, निलेश घोटकुले, सागर खिलारे, अंकुश पवार,सुनील पाटीलयांchyaउपस्थित पार पडला.