फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बारामती (Ferrero India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

बारामती : फेरेरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बारामती (Ferrero India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि व फेरेरो एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये १ जुलै २०२४ ते ३० जुन २०२८ या कालावधीकरिता ४ था ऐतिहासिक वेतन करार संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :

कराराचा कालावधी : दि. ०१/०७/२०२४  ते ३०/०६/२०२८ या ४ वर्षांचा राहील.

एकूण पगारवाढ – १९,००० /- ( एकोणीस हजार रुपये)
-पहिल्या वर्षी ४५ टक्के.
-दुसऱ्या वर्षी २३ टक्के.
-तिसऱ्या वर्षी २२ टक्के. 
-चौथ्या वर्षी १० टक्के.
एक १ जुलै २०२४ पासून चा पागरचा व इतर फरक फेब्रुवारी २०२५ च्या पगारामध्ये जमा होईल.

मेडिक्लेम पॉलीसी : 
पहिले २ वर्ष २,५०,००० /- (अडीज लाख ) नंतरचे २ वर्ष ३,००,०००/-(तीन लाख ) रुपयांची पॉलिसी राहणार असून संपूर्ण खर्च कंपनी करणार.
-डिलिव्हरी साठी नॉर्मल किंवा सिझर 40 हजार रुपये.
-GPA ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी पाच लाख रुपये.

ग्रुप टर्म इन्शुरन्स :
- पहिल्या वर्षी २० लाख रुपये.
- दुसऱ्या वर्षी २२ लाख रुपये.
- तिसऱ्या वर्षी २५ लाख रुपये. 
- चौथ्या वर्षी २५ लाख रूपये.

सुट्ट्यांमध्ये वाढ :
- C L कॅज्युअल लिव्ह मध्ये २ ने वाढ. 
- S L सिक लिव्ह मध्ये १ ने वाढ.
- क्रोनोझ सिस्टीम मध्ये P L सुट्ट्या या कमी येत होत्या, त्याचे कॅल्क्युलेशन करताना आता आपण बदल करून ॲक्च्युअल वर्क डेज, ऑन ड्युटी, ऍडिशनल ऑफ आणि पेड हॉलिडे याचा समावेश करून घेतला आहे यामुळे PL मध्ये वाढ होईल.
 - प्यारेलेसिस आजार सुट्ट्या : जर एखाद्या कर्मचाऱ्याला प्यारीलीसीस सारखा आजार झाला तर त्या कर्मचाऱ्याला पुढील तीन महिने कंपनीकडून अर्धा पगार किंवा मिनिमम वेजेस यापैकी जे जास्त असेल ते दिले जाईल. तसेच कामगारानकडून ही त्यास पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी 50/- रुपये कपात करून त्या कर्मचाऱ्याला दिले जाईल.

इतर सुविधा :
- कॅन्टीनचे किचन इनहाऊस आणि नाष्टा व जेवणामध्ये न्यूट्रिशन फुडचा समावेश.
- क्रिकेटचे सामने ऑन पेपरवर घेतले.
- सोसायटी ऑफिस साठी जागा वाढवून घेण्याचे मान्य करण्यात आले. 
- जनरल शिफ्ट साठी चहा आणि बिस्किट सुरू करण्यात आले.

फ्लेक्झिबिलिटी :
- जर एखाद्या कर्मचाऱ्यास कंपनी बाहेर काम करण्यास पाठवायचे असल्यास कंपनीस खालील नियम व अटींचे पालन करावे लागेल.
- कामगार फक्त महाराष्ट्राच्या आत मध्येच पाठवला जाईल.
- त्याचा कामाचा कालावधी ३ वर्षेच असेल.
- जोपर्यंत तो त्याचे काम शिकत नाही तोपर्यंत त्यास ट्रेनिंग देण्यात येईल.
- पगारासोबत वेगवेगळे अलाऊन्सेस पण देण्यात येतील.
(वरील मुद्द्यासाठी पूर्वीचे चे एग्रीमेंट पाहावे फ्लेक्झिबिलिटी या मुद्द्यांमध्ये त्याचा समावेश आहे.)

लॉंग सर्विस अवार्ड :
१० वर्ष १०,०००/- रुपये.
१५ वर्ष १५,५००/- रुपये.
२० वर्ष २१,५००/- रुपये.

रिटायरमेंट बेनिफिट : यामध्ये कर्मचाऱ्यास ५०,०००/- हजार रुपये देण्यात येतील, तसेच कंपनी प्रोडक्ट देण्यात येतील.

दिवाळी बोनस :
२०२४ पहिले वर्ष ४३,०००/- रुपये.
२०२५ दुसरे वर्ष ४६,०००/- रुपये.
२०२६ तिसरे वर्ष ४९,०००/- रुपये.
२०२७ चौथे वर्ष ५२,०००/- रुपये.

    सदर करारावेळी कंपनी व्यवस्थापनच्या वतीने श्री. थोमोसो बाचिनी (Indian Sub-Continent Region Industrial Manager), श्री. इलारियो डी फेलिस (Indian Sub-Continent Region CFO), श्री. रजेश बांदेकर (Indian Sub-Continent Region HR), श्री. उमेश दुगाणी (Head-Industrial People & Organization), स्नेहा सावंत (Region India Reward Manager), श्री. नितीन नातू (Plant Controller), श्री. योगेश मगदूम (Industrial Relations Manager) तसेच संघटनेच्या वतीने अध्यक्ष रमेश बाबर, सचिव अमोल पवार, उपाध्यक्ष संदिपकुमार बिचकुले, कार्याध्यक्ष प्रविणकुमार थोरात, खजिनदार श्री चंद्रशेखर नाळे, कार्यकारणी सदस्य सचिन पिंगळे, श्री.संतोष पवार, श्री.आनंद जाधव, सौ.लक्ष्मी धेंडे, सौ.भाग्यश्री माने, सौ.रमोला आवळे यांनी सह्या केल्या.

     सदर करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या सातत्य प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली.