सातपूर : येथील एमआयडीसीतील गोल्डी प्रेसिडेंट टेक्नॉलॉजी प्रा.लि. (Goldy Precision Technologies Pvt. Ltd) कंपनी व्यवस्थापन व सिटू प्रणित नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात प्रदीर्घ चर्चा होऊन रु.११०००/- ते रु.१२०००/- रुपये वेतनवाढ करारावर सह्या करण्यात आल्या.
या व्यतिरिक्त कामगारांना इंजिनिअरिंग उद्योगासाठी लागू असलेल्या महागाई भत्तातील वाढ वेळोवेळी मिळणार आहे. त्याचबरोबर २० अर्जित रजा, ७ किरकोळ रजा, ७ आजारीपणाच्या रजा, दोन लाखाचे कव्हरेज असला मेडिक्लेम व बोनस मिळणार आहे. कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जही कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येईल. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख रुपयाचे कव्हरेज असणारे मेडिक्लेम इन्शुरन्स लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्गवारीनुसार रु.५४००/- ते रु.६३००/- वार्षिक प्रवास भत्ताही मिळेल.
वेतन करारावर कंपनीच्या वतीने डायरेक्टर सिद्धेश रायकर, सीईओ, एचआर पूजा रायकर, वरिष्ठ मॅनेजर मंगेश चौधरी व कामगारांच्या वतीने सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉ. डी एल कराड, कॉ सिताराम ठोंबरे, कॉ तुकाराम सोनजे, कॉ संतोष काकडे, कमिटी कामगार प्रतिनिधी मधुकर चौधरी, अशोक सोनवणे, समाधान पाटील, विजय माळी, वैभव शिंदे यांनी सह्या केल्या.