पुणे : पुणे जिल्हा व महाराष्ट्र, भारत व परदेशामध्ये प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू मिठाईवाले (Chitale Bandhu Mithaiwale) व चितळे बंधू मिठाईवाले कर्मचारी संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
कराराची वैशिष्टये खालील प्रमाणे :
कराराचा कालावधी : माहे एप्रिल-२०२४ ते मार्च- २०२७ या तीन वर्षाकरीता लागू राहील.
सदर पगार वाढीतील ५०% रक्कम मुळ पगारात व ५०% रक्कम इतर भत्यामध्ये देण्यात येईल.
बोनस : दिवाळी पूर्वी १५ दिवस अगोदर २०% या दराने बोनस तसेच बोनस व्यतीरिक्त १० हजार रुपये दिवाळी ॲडव्हान्स म्हणुन प्रत्येक कामगारास देण्यात येईल.
मेडिक्लेम पॉलिसी : प्रत्येक कामगाराची 3 लाखाची पॉलिसी उतरवण्यात आली.
गणवेश : दरवर्षी २ चांगल्या प्रतिच्या कापडाचे दोन गणवेश देण्यात येतील.
सदर करारावर व्यवस्थापनाच्या वतीने मा. भागीदार श्री. गोविंद नरसिंह चितळे, इंद्रनिल चितळे व व्यवस्थापन सल्लागार ॲड.श्री.अशोक गुप्ते तसेच संघटनेच्या वतीने कामगार नेते श्री. रामचंद्र शरमाळे, विवेक कांबळे, संघटनेचे अध्यक्ष संदीप जगताप, उपाध्यक्ष विशाल ड्रिंबळे, जनरल सेक्रेटरी अमित सातपुते, खजिनदार अरविंद मोरे, सेक्रेटरी निलेश जाधव कार्यकारणी सदस्य अमुर घुमाळ व योगेश मालपोटे यांनी करारावर सह्या केल्या.