वीज कंत्राटी कामगारांनी द्वार सभा घेऊन हक्कांच्या मागण्या करिता पुकारला एल्गार

पुणे : महाराष्ट्र शासन व वीज कंपनी प्रशासनाने महावितरण, महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना वेतनात ३०% पगारवाढ व कंत्राटदार विरहित रोजगार व अन्य महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यांसाठी ९ फेब्रुवारी रोजी राज्यभर द्वार सभा घेतल्या.

    वितरण व पारेषणच्या नवीन भरतीला स्थगिती देऊन आधी अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलेल्या सुचने नुसार वयात सवलत व विशेष प्राधान्य व आरक्षण द्यावे. भ्रष्ट कंत्राटदारांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्याअधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासनाने त्वरीत चर्चा करून कामगारांना न्याय द्यावा. अन्यथा चौथ्या टप्प्यात दि. २८ व २९ फेब्रुवारी रोजी २ दिवस लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ ने मुख्य कार्यालय बांद्रा मुंबई येथे झालेल्या द्वारसभेच्या वेळी दिला आहे.

    कृती समितीच्या आंदोलनाला राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. यावेळी आपल्या मागण्या ताकतीने मान्य करून घ्यायच्याच असा निर्धार सर्व कामगारांनी व्यक्त केला

कृती समितीच्या महत्वपूर्ण मागण्या :
१) सर्व कंत्राटी कामगारांना ३०% वेतन वाढ देण्यात यावी.  
२) रानडे समिती च्या शिफारशी त्वरित लागु करून कामगारांना एन. एम.आर.माध्यमातून कायम नोकरीत समाविष्ट करावेत.  
३) नोकरीत कायम करत नाही तो पर्यंत भ्रष्टाचार टाळण्यासाठी कंत्राटदार मुक्त रोजगार देण्यात यावा.
४) ४  ऐवजी १५ लाख अपघात निधी, कुटुंबाला ५ लाखाचा मेडिक्लेम, मृताच्या वारसाला नोकरी.
५) सेवा निवृत्ती च्या वेळी ग्रॅच्युइटी मिळावी
या निदर्शनांची शासनाने दखल न घेतल्यास दि ५ मार्च २०२४ पासून राज्यातील सर्व कामगार "बेमुदत काम बंद "आंदोलन करतील 

    महावितरण रास्ता पेठ पुणे येथे झालेल्या द्वारसभेच्या वेळी कृती समिती सदस्य व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे उपमहामंत्री राहूल बोडके, भारतीय मजदूर संघाचे उमेश विश्वाद, प्रादेशिक उपाध्यक्ष प्रवीण पवार, सहसंघटन मंत्री मार्गदीप म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. पुणे जिल्ह्यातील वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या द्वार सभेचे आभार प्रदर्शन पुणे झोन सचिव निखिल टेकवडे यांनी केले.

    राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एकजुटीने या आंदोलनाच्या विविध टप्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती २०२४ चे राज्य संघटक सचिन मेंगाळे व निमंत्रक रोशन गोस्वामी यांनी केले.