पुणे : महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना पुणे जिल्हा, कर्तव्य फाउंडेशन पुणे व श्री समर्थ मंडळ पुणे यांच्यावतीने पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीमती लता सावंत अधीक्षक कामगार उपायुक्त कार्यालय पुणे जिल्हा यांचा शाल श्रीफळ व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन मीना पंडित प्रदेश उपाध्यक्ष भागवत संचालक श्री समर्थ मंडळ पुणे, सोनाली परदेशी अध्यक्ष कर्तव्य फाउंडेशन पुणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या घरेलू कामगार महिलांना साक्षर होण्याकरता संघटनेच्या वतीने पेनचे वाटप करण्यात आले व इथून पुढील काळात अंगठा कोठेही न उठवता स्वतःची सही शिकण्याचा निर्धार करण्यात आला.
श्रीमती लता सावंत यांनी सत्काराला उत्तर देताना संघटना करीत असलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमाचे आपल्या भाषणात कौतुक केले व संघटनेने माझा सन्मान केला त्याबद्दल मी भारावून गेले आहे असे म्हंटले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष मीना पंडित यांनी आपल्या भाषणामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील जन्मस्थळी भेट दिली व तेथील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मापासून त्यांनी महिलांना साक्षर करण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमाची चित्ररूप माहिती पाहिली आणि आपण सुद्धा आपल्या संघटनेच्या काही निरीक्षर असलेल्या महिलांना साक्षर करण्यासाठी पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावा व त्याची सुरुवात आजच्या कार्यक्रमात आपल्या महिलांना साक्षर होण्याकरता पेन वाटून करण्यात आली आहे तसेच पुढील काळात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे महिलांची शैक्षणिक सहल काढण्याचा आपण प्रयत्न करू असे मत व्यक्त केले.
कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनाली परदेशी यांनी पुढील काळात संघटना करीत असलेल्या वेगवेगळ्या समाज उपयोगी उपक्रमांना कर्तव्य फाउंडेशन सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले.
श्री समर्थ मंडळाच्या कार्यकारणी सदस्य स्नेहल भागवत यांनी आपल्या भाषणामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास उपस्थित असलेल्या घरेलू कामगार महिलांचे अभिनंदन केले व या काळात निरक्षर राहून चालणार नाही तर सर्वांनी साक्षर होण्याची गरज आहे त्याकरता निरक्षणांना साक्षर करण्या साठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी केले. व आभार प्रदर्शन संघटनेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवर्णा कोंढाळकर यांनी केले.
याप्रसंगी भगवानराव देशपांडे - श्री समर्थ मंडळ अध्यक्ष, सतीश चिटणीस - कार्यकारणी सदस्य, स्मिता कोरडे, सुवर्णा कोंढाळकर-प्रदेश कार्यकारणी सदस्य, हर्षद पंडित - कार्याध्यक्ष कर्तव्य फाउंडेशन पुणे, उषा जाधव-जिल्हा अध्यक्ष, संध्या आदावडे-जिल्हा उपाध्यक्ष, सुनीता बढे - जिल्हा चिटणीस, शोभना लालन - शहराध्यक्ष, शीला आटपाळकर - शहर उपाध्यक्ष, अनिता गुरव - शहर संघटन मंत्री, यशोदा साळवे, विद्या कांबळे , ज्योती मोरे , मीनाक्षी बागुल, रूपाली सुतार, वनिता इवरे, कांता मांगडे , कुमावत , मंदाकिनी निंबाळकर, नीता पंखावाला ,शीला तांदळे, या संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास संघटनेच्या महिला सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.