६ व्या दिवसी वयोवृद्ध कामगारांचे आमरण उपोषण मागे
यवतमाळ (रूस्तम शेख जिल्हा प्रतिनिधी) : वसंत साखर कारखान्यातील निवृत्त १८१ कामगारांची कोर्टाचे आदेशानुसार भंगार मालाची विक्री करुन येणारी संपूर्ण रक्कम युनियन सोबत केलेल्या दि २१/७/२०२२ च्या तडजोड करारा नुसार मिळणार आहे.
दिनांक ३०/८/२०२२ चे हायकोर्ट आदेशानुसार मिळण्यासाठी गेल्या एक वर्षापासून लढा देत आहेत आर आर सी चा रुपये ४,७६,१०,८५०/- रक्कम कारखाना चे मालमतेवर वर ७/१२ वर बोजा चढविण्यात आल्यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर जाण्यासाठी अडचण येत असल्याने या सेवानिवृत्त कामगारांची आणि युनियनची एन ओ सी घेतल्याशिवाय भाडेतत्त्वाचा प्रस्ताव सादर करता येणार नाही म्हणुन अवसायक यांनी एन ओ सी देण्याची विनंती केली असता या कामगारांनी कारखाना सुरू व्हावा व शेतकर्यांना होणारा त्रास दुर व्हावा व बेकारीत असलेल्या कामगार, कर्मचारी यांना काम मिळेल यासाठी त्याग करून कारखान्यास एन एन ओ सी दिल्यामुळे कारखाना सुरू झाला भंगार विक्रीस मंजुरी पत्रातील अट क्र ३ मूळे रक्कम मिळणार नसल्याने दिनांक १८ डिसेंबर पासून उपविभागीय अधिकारी ऊमरखेड यांचे कार्यालया समोर भिमराव मुनेश्रवर, दतराव खडाळे, रामराव राणे, प्रल्हाद दामोदर यांचे आमरण उपोषण पि के मुडे, विठ्ठल पतंगराव, विलास चव्हाण, पी डी देशमुख यांचे नेतृत्वात सुरू केले.
४ उपोषणार्थी यांची तब्येत खालावलामुळे दवाखान्यात अँडमिट करावे लागले त्याजागी उतम पाटील, गोविंद गायकवाड, पी एस नरवाडे, रामचंद्र जाधव ,जी व्ही हरणे सतत उपोषण सुरूअसल्याने अखेर दि २२/१२/२०२३ रोजी साखर आयुक्त पुणे यांनी दि ६/१२/२०२३ चे भंगार विक्रीस मंजुरी पत्रातील अट क्र ३ सदर आदेशातुन वगळण्यात येत आहे व भंगार विक्रीची संपूर्ण रक्कम दि ३०/८/२०२२ चे हायकोर्ट आदेशानुसार आर आर सी आदेशची रक्कम चार कोटी शहात्तर लाख दहा हजार आठशे पन्नास रुपये १५ टक्के व्याजासह देण्याचे साखर आयुक्त यांनी मा अवसायक यांना पत्र पाठविण्यात आले हे पत्र मा अवसायक यांनी दिनांक २३/१२/२०२३ रोजी भंगार विक्रीची संपूर्ण रक्कम हायकोर्ट आदेशानुसार १८१ निवृत्त कामगारांची रक्कम देण्याचे लेखी पत्र देवुन मान्य केले
यामुळे सुरू असलेल्या आमरण उपोषणची सागंता ज्युस देवुन झाली यावेळी कारखान्याचे अवसायक, तातु देशमुख, मा आ विजयराव खडसे, देवानंद पाटील,बालाजी वानखेडे ,अरविंद भोयर, अजय नरवाडे प्रशांत पतेवार भालेकर आणि महिला व निवृत्त कामगार उपस्थित होते. उपोषणाची पाशैभुमि युनियनचे अध्यक्ष पि के मुडे व आभार विठ्ठल पतंगराव यांनी ,मानले आमरण उपोषण सतत सुरू राहण्यासाठी एन एस आमले, विनोद शिंदे, भिमराव सोनुले यांनी मेहनत घेतली.