यवतमाळ (रुस्तम शेख) : यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत शासन अनुदानास पात्र व ई .आर .पी प्रणाली मध्ये नोंदी असलेल्या शासन हिस्सा प्राप्त होणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2023 चे वेतन उपस्थिती प्रक्रिया वसुलीची कोणतीही टक्केवारी अट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर न लागता शासन आदेश निर्देशानुसार ग्राम स्तरावरील वसुली करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांची निश्चित केली असून त्यानुसार त्यांना दरमहा वेतन मिळणे आवश्यक आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून ग्राम स्तरावरील संगणक परिचालक राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन अप्रोवल पूर्णतः थांबलेले आहे.
त्याकरिता ग्रामसेवक व तालुका समन्वयक यांच्या सहकार्याने युजर आयडी व पासवर्ड च्या साह्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपस्थिती हजेरी तातडीने पूर्ण करावे.अशा सूचना व आदेश आपल्या स्तरावरून संबंधित ग्रामपंचायत सचिव व तालुका समन्वयक यांना अवगत करून तातडीने अप्रोवाल देण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ (पंचायत विभाग )तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब यांना सदर मागण्याचे निवेदन देण्यात आले असून ग्रामपंचायत कर्मचारी हक्काचे वेतनापासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊन ग्रामसेवक व तालुका समन्वयक यांना अवगत करावे व कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित राहिल्यास किंवा त्यास होणाऱ्या विलंबास सदर कर्मचारी कार्यालयास जबाबदार धरण्यात यावे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळावी असे आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे.
सदर निवेदन देतेवेळी ॲड. अरुण जवके जिल्हाध्यक्ष, प्रदीप बोढाले कार्याध्यक्ष, ओमप्रकाश वाघमारे उपाध्यक्ष ,पुंडलिक राठोड, कैलास येरके ,राजेंद्र बोढा ले, अशोक मानकर, संगपाल रामटेके, रणजीत मेहर ,विश्वंभर मिरासे, वामन राठोड, कैलास राठोड, प्रकाश शेळके, गुणवंत मढ वे ,दिलीप पिंपरे पुसद, दत्तराव कळंबे ,चंदन जाधव, गजानन कांबळे व इतर ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात गुणवंत मढवे यांनी दिली आहे.