चाकण : चाकण पुणे MIDC येथील मिंडा वास्ट ॲसेस सिस्टम प्रा.लि.(Minda Vast Access Systems Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि मिंडा वास्ट एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
करार कालावधी : कराराचा कालावधी चार वर्षे (दि.01 जून 2025 ते 31 मे 2029)
पगार वाढ : एकूण सरासरी वेतनवाढ ₹ 20,000/-
फरक रक्कम : दि.01 जून 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीतील फरक रक्कम एकरकमी देण्यास मान्यता
2025 – ₹ 30,000/-
2026 – ₹ 30,000/-
2027 – ₹ 30,000/-
2028 – ₹ 30,000/-
EL – 15
SL – 07
CL – 07
(कंपनी पॉलिसीनुसार)
पेड हॉलिडेज : वार्षिक 10 दिवस (पॉलिसीनुसार)
ग्रुप लाईफ टर्म इन्शुरन्स : ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसीनुसार लागू
मेडिकल इन्शुरन्स : ₹ 1.5 लाख प्रतिवर्ष (पती, पत्नी व तीन अपत्यांसाठी – पॉलिसीनुसार)
वार्षिक फॅमिली डे : वर्षातून एकदा आयोजन करण्यास मान्यता
ग्रंथालय : आस्थापनामध्ये सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध करून देण्यास मान्यता
पाळणाघर : आस्थापनातील विद्यमान पाळणाघर अधिक सुसज्ज करण्यास मान्यता
उच्च शिक्षण : कामगारास उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास, कंपनी पॉलिसीनुसार शिक्षण खर्च करण्यास मान्यता
मागील सर्व सुविधा : जशाच्या तशा कायम ठेवण्यास मान्यता
सदर करारावेळी कंपनी व्यवस्थापन यांच्यावतीने श्री.धमेंद्रजी सक्सेना (MD), श्री. हिमांशुजी जैन (MD), श्री.निरजजी तिवेतीया (Group ER Head – President), श्री.नितीनजी त्यागी (Head BV-1 HRBP), श्री. रवीजी सारावत (CFO), श्री. यशपालजी सिंग (Plant Head), श्री. अनंतजी पाटील (Lead – HR & IR), श्री. योगेशजी माकोटे (Dy. Manager – HR & IR) तसेच मिंडा वास्ट एम्प्लॉईज युनियन यांच्यावतीने श्री. प्रमोद खुळे (अध्यक्ष), श्री. राहुल कुटे (जनरल सेक्रेटरी), श्री. दिपक गाडे (उपाध्यक्ष), श्री. मनोज फसले (उपाध्यक्ष), श्री. संदीप बानेकर (खजिनदार), श्री. सचिन अंधारे (सह-सचिव), श्री. रोशन उपाध्ये (सह-सचिव), श्री. सोमाजी वाघ (सभासद) , श्री. दत्तात्रय भोसले (सभासद) उपस्थित होते
हा करार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष ॲड. श्री.किशोरजी ढोकले तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, पुणे यांच्यावतीने श्री. दत्तात्रय येळवंडे साहेब, श्री. राजू आण्णा दरेकर, श्री.अविनाशजी वाडेकर, श्री. गणेशजी जाधव, श्री. राकेशजी चौधरी यांचे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा.आमदार श्री. बच्चुभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्ष सरचिटणीस पिंपरी–चिंचवड श्री.रामभाऊ कुकडे, पोलीस मित्र चाकण श्री. संग्रामभाऊ सावंत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

