शिरूर,पुणे : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती एमआयडीसीत येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कामगार संघटनेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नुकतीच अरुण घुले यांची बिनविरोध निवड झाली मा. औद्योगिक न्यायालय, पुणे यांच्या दि. १३/०७/२०२३ रोजीच्या आदेशानुसार श्रीमती. त. श. अत्तार, उपनिबंधक श्रमिक संघ, पुणे, विभाग, यांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची निवडणूक घेऊन प्राप्त आदेशाद्वारे कार्यकारिणीचे एकूण नऊ पदाधिकारी बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले आहे.
यावेळी सदर निवडणूक प्रक्रियेसाठी निवडून आलेल्या कमिटीस कायदेशीर सल्ला ऍड. नितीन कुलकर्णी यांनी दिला. तसेच कायदेशीर मार्गदर्शन श्रमिक एकता महासंघाचे सल्लागार मारुती जगदाळे व श्रमिक एकता महासंघाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. उपमहापौर केशव घोळवे यांनी दिला. निवडून आलेल्या कमिटीने कंपनीच्या गेटवर पेढे वाटप करून, गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. व कंपनीतील इतर कामगारांनी सर्वांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सदर हा विजय आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती असून संघटनेच्या सभासदांनी नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचा आहे अशा भावना नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण घुले यांनी व्यक्त केली.